Tuesday, November 14, 2023

Latest Posts

‘त्या’ सहा जणांची नावं २४ तारखेला सांगतो; मनोज जरांगे

'तुम्ही कुणासाठी काम करता हे आम्हाला आता कळलं असून तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, वेळोवेळी वेगवगेळी वक्तव्य करून तुम्ही सरड्यासारखे रंग बदलत आहात.

‘तुम्ही कुणासाठी काम करता हे आम्हाला आता कळलं असून तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, वेळोवेळी वेगवगेळी वक्तव्य करून तुम्ही सरड्यासारखे रंग बदलत आहात. तुमच्यासारखा विरोधी पक्ष देशात कुणी नाही, तुमची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी असून मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात, असे आरोप करत येत्या 24 डिसेंबरला मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या सहा जणांची नावेही सांगतो असा इशाराच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणावरून राज्यात (Maratha Reservation) रान पेटले असून छगन भुजबळ-मनोज जरांगे यांच्यातला (Chhagan Bhujbal) शाब्दिक वाद शमतो ना शमतो तोवरच नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर मनोज जरांगे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विजय वड्डेट्टीवार (Vijay Vaddettiwar) यांनी म्हटले की, ‘मराठा तरुणांनी अभ्यास करून विचार करून आपण कोणाला साथ देत आहे, आपला भलं कशात आहे, हित कशात आहे, याचा विचार करावा…असे विधान केले आहे. यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. ते म्हणाले की, आम्हाला मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. आता फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहात. पण आमची मुलं दूधखुळी नाहीत, मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात, आता तुमच्या सल्ल्याची सुद्धा गरज नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी वड्डेट्टीवार यांना सुनावले आहे.

 

येत्या 24 तारखेला सगळं सांगतो….
दरम्यान, याचवेळी मनोज जरांगे यांनी विजय वड्डेट्टीवार यांना इशारा देत इतर राजकीय नेत्यांना घाम फोडला आहे. जरांगे म्हणाले की, तुम्ही काय चीज आहे, हे आम्हाला आता कळले, तुम्ही 5 ते 6 जण काय नमुने आहेत, हे आम्हाला कळलं. त्यामुळे तुम्ही आता आमचे मराठ्यांचे शत्रू झालात. आता कुणबी नोंदीचे पुरावे मिळू लागले म्हणून काहीही बोलू लागले आहेत. मात्र थोडं थांबा, मराठे आता काही दिवसात तुम्हाला सल्ले शिकवतील, असं जरांगे म्हणाले. शिवाय विजय वड्डेट्टीवर यांच्यावर निशाणा साधत ‘असला विरोधी पक्ष नेता असतो का? असले विचार करून तुमचा पक्ष कसा राहील, राहुल गांधीने हेच शिकवलं का तुम्हालाअसा सवाल करत मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या त्या 6 जणांचे नाव 24 तारखेला सांगतो, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.

हे ही वाचा : 

दिवाळीत तयार झाल्यानंतर फोटोशूटसाठी कसे फोटो काढायचे, तर करा ‘या’ सहा टिप्स

आजचे राशिभविष्य,१० नोव्हेंबर २०२३;नशिबावर हवाला ठेवून न राहता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss