संत तुकाराम महाराज यांचे ११व्या वंशजांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे असं नाव आहे. देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली. आर्थिक परिस्थितीमुळे शिरीष महाराजांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिकची माहिती अद्याप समोर आली नाही आहे.
प्राथमिक माहिती अशी, शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र आज सकाळी त्यांनी बराचवेळ दार उघडला नाही. दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास लावून घेतला. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहे.
20 दिवसांपूर्वीच शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. 20 फेब्रुवारीला मोरे यांचा विवाह होणार होता. शिरीष महाराज मोरे हे अवघ्या 30 वर्षांचे होते.ते उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. मात्र, यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. शिरीष महाराज यांनी खोलीत एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. तुकाराम महाराजांचे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येच्या बातमीने देहूनगरीत एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचेनेतून त्यांनी आत्महत्येचे केल्याचे कळत असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हे ही वाचा :
Follow Us