महाडमधील केमिकल कंपनीत (Mahad Fire) लागलेल्या अग्नितांडवात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यूदेह हाती आले आहेत. तर दोन कामगार अजूनही बेपत्ता आहेत. जवळपास 10 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. महाडमधील ब्लू जेट केमिकल कंपनीत (Blue Jet Healthcare company fire) शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली होती. या कंपनीत आधी स्फोट होऊन आग लागली, त्यामुळे 11 कामगार अडकले होते. तर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जे कामगार कंपनीत अडकले होते, त्यापैकी 9 जणांचे मृतदेह हाती आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 7 तर आज सकाळी 2 मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या स्फोटाची भीषणता पाहून कालच NDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.
NDRF चे सर्च ऑपरेशन
दरम्यान, काल सकाळी स्फोटानंतर कंपनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा काहीच पत्ता लागत नसल्याने NDRF पथक बोलावण्यात आलं होतं. शुक्रवारी संध्याकाळी हे पथक घटनास्थळी दाखल झालं. या पथकाने रात्री 11.30 च्या सुमारास कंपनीत ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यावेळी त्यांना आधी 4 मृतदेह सापडले. नंतर एक एक करुन आणखी 3 मृतदेह हाती लागले. त्यानंतर आज आणखी दोन कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळून आल्याने, 11 पैकी 9 कामगारांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. n
हे ही वाचा :
फुलंब्रीकर कुटुंब कसं आहे,हे जाणून घ्यायचंय तर या कुटुंबाला एकदा येऊन तर भेटा!
शाहरुखच्या ‘डंकी’ मध्ये झळकल्या ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री