राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार झाल्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र आज होणारी तलाठी भरती परीक्ष होणारच असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसांपासून तलाठी परीक्षाकेंद्राच्या मागे साडेसातीचा सत्र सुरु आहेत. परीक्षा या वेळेत तर होताच नाहीयेत मात्र या परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना जणू काही अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे.
मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मराठवाड्यातील बससेवा देखील बंद आहे. त्यामुळे परिक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी याबद्दल सोशल मीडिया साइट ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न आहे. राज्य सरकारच्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्ह राज्यात अनेक ठिकाणी बंदची हाक दिली असल्याने बससेवा बऱ्याच भागात बंद आहे. त्यामुळे सरळसेवा तलाठी परिक्षेच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचणी येत आहेत. काही विद्यार्थी पोहचले आहेत तर काही पोहचू शकणार नाहीत अशी स्थिती आहे.राज्य सरकारने याविषयी त्वरित दखल घेऊन काय मार्ग काढता येईल याचा विचार करायला हवा.
जे परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोहचतील त्यांची परीक्षा घ्यावी व जे पोहचू शकणार नाहीत त्यांची परीक्षा नंतर घ्यावी, तसेच एक मिनिट लेट झाले तरी परीक्षार्थीना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही,यासंदर्भात देखील सक्ती न करता, ५ ते १० मिनिटे परीक्षा केंद्रावर उशिरा पोहचल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न आहे, त्यामुळे राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की केवळ बघ्याची भूमिका न घेता त्वरित कार्यवाही करावी.” असेही रोहित पवार म्हणाले आहेत. दरम्यान ४ सप्टेंबर रोजी राज्यात सर्वत्र तलाठी भरती परीक्षा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर रहावे असे परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडून सांगण्यात आलं आहे. याबाबत विद्यार्थ्यांना मेल करण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षास्थळी न पोहचू शकलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत येऊ शकते.
हे ही वाचा:
प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की आजही आम्ही फोनवर बोलतो…
पंकजा मुंडे यांचा सुरु होणार शिवशक्ती परिक्रमा दौरा