spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

सुरेश धस जे आरोप करतात त्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त झालं पाहिजे – Laxman Hake

राज्यभरात बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले आहे. या प्रकरणासंदर्भात स्थानिक भाजप नेतेही रस्त्यावर उतरले आहेत. त्यात भाजप आमदार सुरेश धस यांनी आघाडी घेतली आहे.

राज्यभरात बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले आहे. या प्रकरणासंदर्भात स्थानिक भाजप नेतेही रस्त्यावर उतरले आहेत. त्यात भाजप आमदार सुरेश धस यांनी आघाडी घेतली आहे. सुरेश धस रोज आक्रमक वक्तव्य करत असून महायुतीतील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यावर ओबीसी आरक्षक लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले की, “हा सर्व राजकीय अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न आहे. गुन्हेगाराला कुठलीही जात-पात धर्म नसतो. हत्येचे कारण पुढे करून राज्यात ठीक ठिकाणी मोर्चे काढले जातात हे मोर्चे वंजारी जातीला गुन्हेगार ठरवण्यासाठी आणि वंजारी समाजाला टार्गेट करण्यासाठी काढले जात आहेत. १०० ते १५० वंजारी समाजाचे अधिकारी आहेत. ते बहुजन सन्मान यात्रा मराठवाड्यात काढणार आहेत. जाणूनबुजून लक्ष केले जात असतील तर आम्ही देखील प्रती मोर्चे काढू. शरद पवार जिथे जिथे गेले तिथे काय काय झाले या घटना बघा. पवारांच्या पुण्यात मुळशी पॅटर्न हा सिनेमा निघाला. पवारांना राजगुरुनगर मधील चिमुकल्यांची हत्या का दिसत नाही ? शरद पवारांचे जसे वय वाढत आहे असा त्यांचा जातीयवाद देखील वाढत आहे.”

“पवारांच्या काळात खैरलांजी प्रकरण घडले. खर्डा, जवखेडामध्ये अनेक हत्या झाल्या. त्यावेळी शरद पवारांनी कुणाला पत्र लिहिले का ? संतोष यांच्या हत्येला न्याय देण्यासाठी जातीयवादी भाषणे सुरू आहे. दोन दिवसात संभाजीनगर मधून प्रति आंदोलनाला सुरुवात करू. ओबीसीमधील एक समाज पुढे जात आहे त्याचीही पोटदुखी आहे. शरद पवारांना गावगाडा कळालेला नाही त्यामुळं ते कधीच प्रधानमंत्री झाले नाहीत. सुरेश धस जे आरोप करतात त्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त झालं पाहिजे. सुरेश धस महसूल राज्यमंत्री असताना लाच लुचपत विभागाची त्यांच्या बंगल्यावर धाड पडली होती. २३ लाखाच्या प्रकरणांमध्ये सुरेश धस यांच्या बंगल्यावर मंत्री असताना पडलेली धाड देशातील एकमेव घटना आहे. प्रत्येकाने न्यायव्यवस्थेवर विश्वास दाखवावा. परभणीमधली जालन्यामधली मराठवाड्यामध्ये सध्या कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे”, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

हे ही वाचा:

छत्तीसगड येथे नक्षलवादी हल्ला, IED ब्लास्टमध्ये ९ जवान शहीद, अनेक जखमी

शिवाली परब, अलका कुबल आणि शशांक शेंडे या दमदार कलाकारांच्या ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss