राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यात आता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लवकरच होणार असल्याचं महायुतीकडून जाहीर करण्यात आले आहे.
५ डिसेंबरला दुपारी १ वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचे बोलले जात आहे. राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ५ डिसेंबरच्या सुमारास नवे सरकार स्थापन होऊ शकणार आहे. नार्वेकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात शपथविधीबाबत चर्चा रंगल्या आहेत. नव्या सरकारचा शपथविधी मुंबईतील आझाद मैदान येथे होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.