Monday, December 4, 2023

Latest Posts

राज्यातील ड्रग्सचे रॅकेट सुरूच

ललित पाटील (Lalit Patil) या ड्रग्स (Drugs) प्रकरणातील मुख्य आरोपीमुळे दिवसेंदिवस ड्रग्सबद्दलचे प्रकरण उघडकीस येत आहेत. ससून रुग्णालयातून त्याने पळ काढला आणि त्यांनतर त्याचे ड्रग्स प्रकरण उघडे पडले. या प्रकारानंतर एमडी ड्रग्स बनवणारे नाशिक (Nashik) आणि संभाजी नगरमधील (Sambhaji Nagar) कारखाने गेल्या काही दिवसांत पोलिसांना मिळाले आहेत. त्याठिकाणी एमडी ड्रग्सचा मोठा साठा मिळाला होता. आता सोलापूरमध्येही एमडी ड्रग्सचा कारखाना नाशिक पोलिसांना मिळाला. या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स मिळून आले. सोलापूर (Solapur) मध्ये एमडी ड्रग्सचा कारखाना सुरू असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सोलापूरच्या मोहोळ एमआयडीसीमधील कारखान्यावर नाशिक पोलिसांनी कारवाई केली. कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्स पोलिसांनी जप्त केले.

नाशिक पोलिसांच्या तीन पथकांनी सोलापूरमध्ये जाऊन कारवाई करण्यात आली. कारखान्यात एमडी ड्रग्स आणि ड्रग्ससाठी लागणारा कच्चामाल पोलिसांनी जप्त केला. या ठिकाणी १० कोटींचे ड्रग्स मिळाले आहे. तसेच आठ जणांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत. यासंदर्भात बोलताना नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी १२.५ ग्राम एमडी सापडले होते. त्या प्रकरणाचा तपास करत असताना काही आरोपींना अटक केली होती. सनी पगारे, अर्जुन पिवल, मनोज गांगुर्डे, सुमित पगारे यांना अटक झाली. त्यांच्याकडून पाच किलो एमडी ड्रग्ज मिळाले होते.

नाशिक पोलिसांनी आरोपींची चौकशी केली. त्यानंतर सोलापूरमध्ये पथक पोहचले. पोलिसांनी १० किलो एमडी ड्रग्स सोलापूरमधून जप्त केले. या ठिकाणी मनोहर काळे याला ताब्यात घेतले. तसेच अक्षय नाईकवाडे याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात एकूण ८ आरोपी अटक केली असून २ फरार आरोपी फरार असल्याचे आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. हा कारखाना कधी सुरू झाला? याची माहिती अजून मिळाली नाही.

हे ही वाचा : 

पूजा एक पण उपमुख्यमंत्री दोन, पूजेचा मान द्यावा कोणाला?

भाजपने निलेश राणेंची समजूत काढली की त्यांना समज दिली?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss