Vidhansabha Election 2024: गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सर्वांनाच 23 नोव्हेंबर अर्थात निकालाच्या दिवसाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 288 मतदारसंघांकरिता दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण 3 कोटी 34 लाख 37 हजार 57 पुरूष, 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिलातर 1 हजार 820 इतर मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित झाली आहे. यात प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतमोजणी करतांना टपाली मतदानाचा समावेश करण्यात येईल. त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाद्यारे भरण्यात आलेला 17 सी हा प्रत्यक्ष झालेल्या मतदानासंदर्भातील फॉर्म उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही देण्यात आला असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
- अहमदनगर – ७१.७३ टक्के,
- अकोला – ६४.९८ टक्के,
- अमरावती – ६५.५७ टक्के,
- औरंगाबाद- ६८.८९ टक्के,
- बीड – ६७.७९ टक्के,
- भंडारा – ६९.४२ टक्के,
- बुलढाणा – ७०.३२ टक्के,
- चंद्रपूर- ७१.२७ टक्के,
- धुळे – ६४.७० टक्के,
- गडचिरोली – ७३.६८ टक्के,
- गोंदिया – ६९.५३ टक्के,
- हिंगोली – ७१.१० टक्के,
- जळगाव – ६४.४२ टक्के,
- जालना – ७२.३० टक्के,
- कोल्हापूर – ७६.२५ टक्के,
- लातूर – ६६.९२ टक्के,
- मुंबई शहर- ५२.०७ टक्के,
- मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,
- नागपूर – ६०.४९ टक्के,
- नांदेड – ६४.९२ टक्के,
- नंदुरबार- ६९.१५ टक्के,
- नाशिक – ६७.५७ टक्के,
- उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,
- पालघर – ६५.९५ टक्के,
- परभणी – ७०.३८ टक्के,
- पुणे – ६१.०५ टक्के,
- रायगड – ६७.२३ टक्के,
- रत्नागिरी – ६४.५५ टक्के,
- सांगली – ७१.८९ टक्के,
- सातारा – ७१.७१ टक्के,
- सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,
- सोलापूर – ६७.३६ टक्के,
- ठाणे – ५६.०५ टक्के,
- वर्धा – ६८.३० टक्के,
- वाशिम – ६६.०१ टक्के,
- यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे.
हे ही वाचा:
संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर केली नारायण राणेंनी टीका…
Vidhansabha निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पंढरपुरात प्रतिबंधक आदेश व वाहतूक नियोजन आदेश जारी