मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, याचे पडसाद वेगवेगळ्या ठिकाणी उमटताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झाले आहे. आता माढा तालुक्यातील रांझणी भिमानगर ग्रामपंचायत सरपंच चंचला विजय पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला सरपंच आहेत.
माढा तालुक्यातील रांझणी भिमानगर ग्रामपंचायत सरपंच चंचला विजय पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे . मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. रांझणी भिमानगर येथे साखळी उपोषणाला सुरूवात झाली असून शिवकन्या प्राची सुरेश जाधव व मेजर संजय गोटणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहून सरपंच प्रतिनिधी गणेश पाटील यांनी ही घोषणा केली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील महिला सरपंच पदाचा राजीनाम चंचला पाटील यांनी दिला असल्याने आरक्षणाची धग आता अधिकच तीव्र झाली आहे.
बुरुडगाव येथील नऊ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा
अहमदनगरपासून जवळच असलेल्या बुरुडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी सामूहिक राजीनामा दिला आहे .११ सदस्य संख्या असलेल्या ९ सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये लोकनियुक्त सरपंचाचाही सहभाग आहे. राजीनामा देणाऱ्यामध्ये सरपंच- अर्चना कुलट, उपसरपंच महेश निमसे, सदस्य- सिराज शेख, खंडू काळे, ज्योती कर्डीले,अक्षय चव्हाण, नयना दरंदले,शीतल ढमढेरे, रुक्मिणी जाधव, रंजना कुलट यांनी राजीनामा दिला आहे.
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .