spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

नागरीकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक चिंतेची आणि गंभीर बाब, Guillain Barre Syndrome बाबत काय म्हणाले Sharad Pawar?

'जीबीएस' अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुणे शहर आणि शहरालगत काही भाग विशेषतः सिंहगड रस्त्यावरील पुणे मनपामधील नवी समाविष्ट गावांमध्ये नागरीक बाधित झाल्याचे निदर्शनात आले आहे.

गुलियन बेरी सिंड्रोम या आजारावर पुणे महानगरपालिका सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाने या आजाराच्या जनजागृतीबाबत तसेच घ्यावयाच्या काळजीबाबत तातडीची बैठक बोलावली होती.त्यानंतर आता शरद पवार यांनी या आजाराविषयी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नेमका हा आजार कुठून कसा होतो यावर एक्सपर्ट टीम सोबत बैठक घेण्यात येणार आहे. पुण्यातील तीन ते चार हॉस्पिटलमध्ये २२ संशयित रुग्ण आहे. सहा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत. या सगळ्यांचे सॅम्पल्स एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत.

हा आजार एका कोणत्यातरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जाते. १२ ते ३०  च्या दरम्यानच्या वयोगटातल्या लोकांना आजार होतो. हा आजार धोकादायक नाही आणि घाबरून जाण्याचे कारण नाही.
या आजारासंदर्भात तातडीची बैठक बनवण्यात आली आहे. सगळ्या स्पोर्टशी कमिटी तयार करण्यात येणार आहे. या सगळ्या संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर तोडगा काढणार आहोत. सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचं कारण नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. वेगळी ट्रीटमेंट लागत नाही. नेहमीची जी ट्रीटमेंट असते ती ट्रीटमेंट दिली जाते. लवकरात लवकर बरं होणारा हा आजार आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे.

या आजाराची दाहकता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काळजी व्यक्त केली आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त होत शरद पवार यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘जीबीएस’ अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुणे शहर आणि शहरालगत काही भाग विशेषतः सिंहगड रस्त्यावरील पुणे मनपामधील नवी समाविष्ट गावांमध्ये नागरीक बाधित झाल्याचे निदर्शनात आले आहे. या दुर्मिळ आजाराची दाहकता लक्षात घेता आणि नागरीकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक चिंतेची आणि गंभीर बाब म्हणावी लागेल. दूषित पाण्यातून या आजाराचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन व राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी. संभाव्य संकटाचे अतिदक्षतापू्र्वक योग्य नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी ट्विटमार्फत म्हटले आहे.

हे ही वाचा : 

घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत

देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या कर्णधारांचे फडणवीसांनी केले विशेष कौतुक, ..ही विजयश्री अविस्मरणीय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss