spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील घटना, लोखंडी रॉड गरम करून दिले चटके…

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आनवा येथे २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या रात्री महादेव मंदिरावर एका तरुणाला गावातील काही गावगुंडांनी जुन्या वादातून अमानुष मारहाण करत लोखंडी रोड गरम करत चटके देऊन जीवी मारण्याचा प्रयत्न केला.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आनवा येथे २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या रात्री महादेव मंदिरावर एका तरुणाला गावातील काही गावगुंडांनी जुन्या वादातून अमानुष मारहाण करत लोखंडी रोड गरम करत चटके देऊन जीवी मारण्याचा प्रयत्न केला, याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड यास पारध पोलीस ठाणे आणि एल.सी.बी च्या पथकाने मोठ्या शिताफीने पारध पोलीस ठाणे हद्दीतील कोदा या गावातून त्याच्या मुसक्या आवळल्या.

या मध्ये आणवा येथील शेतकरी कैलास गोविंदा बोराडे हा दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी सोनू दौड याने कैलास सोबत जूना वाद उकरून काढला त्यातून त्यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली याचे रूपांतर मारहाणीत झाले. त्या नंतर सोनुचा भाऊ शिवसेना उबाठा गटाचा माजी जि.प.सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख नवनाथ सुदाम दौड यांच्या सांगण्यावरून सोनु ने कैलासला विवस्त्र करून लोखंडी रॉड जळत्या चुली मध्ये तापवून त्या अती तप्त रॉडने कैलास यास विवस्त्र करून कैलासच्या शरीरावर, मानेवर, दोन्ही पायांच्या पोट्ऱ्यावर, मांड्यांवर, सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे त्याच्या गुप्तांगावर आणि पुष्ठभागावर निर्दयीपणे चटके दिले. त्यामुळे कैलास गंभीर रित्या जखमी झाला. ही सगळी घटना घडत असताना तिथे उपस्थित असलेल्या जमावाने त्यांचे भांडण सोडविण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही उलटपक्षी बघ्याची भूमिका घेऊन घडलेल्या प्रकारचे फोटो, व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली. खर तर ही अतिशय संतापजनक बाब आहे. कैलासवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

या संदर्भात कैलास बोराडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ सुदाम दौड आणि सोनू उर्फ भागवत सूदाम दौड (दोघेही रा. जानेफळ गायकवाड )या दोन्ही भावांच्या विरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले.मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून दोघे भाऊ फरार होते. मात्र पारध पोलीस ठाण्याचे स.पो.नि.संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय.वाल्मीक नेमाने आणि त्याच्ये पथक तसेच जालना विशेष गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक यांनी संयुक्तिकरित्या कार्यवाही करत आज शनिवार दि.१ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आणवा परिसरातील कोदा शिवरातून स.पो.नि.माने यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय.वाल्मीक नेमाने, पो. हे.काँ.प्रकाश सिनकर, शिवाजी जाधव यांच्यासह जालना स्थागुशाने मोठ्या शिताफीने मुसक्या आवळून पारध पोलीस ठाण्यात अनुन भोकरदन न्यायालयात हजर करण्यात आले, आरोपीला ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यामधील मुख्य आरोपी नवनाथ दौड हा अद्यापही फरार असून त्याच्या स्वतःसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे.

Latest Posts

Don't Miss