जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चा काढण्यात आले होते. पण अजूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे. आज सांगली मध्ये मराठा क्रांती मोर्चाला (Maratha Kranti Morcha) सुरुवात झाली आहे. हा मोर्चा पुण्यातील विश्रामबाग चौक मधील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे. महिला आंदोलकांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघला आहे. जालन्यातील अंतरवली सराटी गावात झालेल्या लाठीमाराचा निषेद करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून मराठा आंदोलक आले आहेत.
मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या मोर्चात सहभागी झालेल्या महिला त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या मुलांनी चांगले गुण असूनही संधी मिळत नाही. त्यामुळं आम्हाला आमचे हक्क मिळावेत अशी त्यांनी मागणी केली आहे. मागील १० दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चासाठी वातावरण तयार करण्यात आले होते. काल एक दिवस अगोदर मोर्चासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. जिह्ल्यातील प्रत्येक भागातून मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. या मोर्चात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) सहभागी होणार आहेत. सांगलीतील या मोर्चाची सुरुवात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. १०० वर्षीय जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करुन मोर्चाला पुढे निघाला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून जिजाऊ वंदनाने मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली. मशाल हाती घेतलेल्या महिलांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत आहे. सध्या मोर्चावर मुसळधार पाऊस पडत आहे.
या मोर्चाची सुरुवात विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकापासून झाली आहे. त्यानंतर मोर्चा गेस्ट हाऊस, मार्केट यार्ड, कर्मवीर चौक मार्गे राम मंदिर चौकात पोहचणार आहे. त्या ठिकाणी चार भाषण होणार आहते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग दिसून येत आहे. आमच्या मुलांच्या भविष्यासासाठी आम्ही एकत्र आला असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत