जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज १०वा दिवस असून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावर ठाम आहेत. आज सरकारच्या जीआरनंतर ते उपोषण सोडतील असं वाटलं होतं. मात्र त्यांनी आरक्षणावर ठाम असल्याचं सांगितलं. यावर आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आली आहे.बच्चू कडू म्हणाले की, राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत असून सरकारकडून आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. तरी देखील त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही. हे आंदोलन आता मागे घेतलं गेलं पाहिजे. खुद्द मुख्यमंत्री अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने आरक्षणाचा विचार करत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षणासाठी सुरु केलेलं आंदोलन आता थांबवलं पाहिजे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता अत्यंत सकारात्मक भूमिका या प्रकरणात घेतली आहे. कुणबी हा मराठा आणि मराठा हाच कुणबी आहे, हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. त्यामुळे मराठ्यांना वेगळं आरक्षण देणं हा वेगळा भाग आहे. मात्र आता मराठा समाजाने आरक्षण मागे घेतलं पाहिजे. मराठा हे नाव एका धर्माचं, पंथाचं, जातीचं नाही. या मुलुखात जे राहतात ते मराठे असंही बच्चू कडूंनी म्हटलं आहे. राज्यात दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाल्या नंतर दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असून आतापर्यंत तेरा जिल्ह्यात दिव्यांगांच्या दारी अभियान हा कार्यक्रम राबवण्यात आला असून या कार्यक्रमामुळे आतापर्यंत ६६ हजार अपंग लोकांचे तक्रारीचे निवारण करण्यात आलं.
आज नंदुरबार जिल्ह्यात दिव्यांगांच्या दारी अभियान या कार्यक्रमासाठी बच्चू कडू नंदुरबार जिल्ह्यात आले होते, तिथे त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कुणबी हा मराठा आहे आणि मराठा हाच कुणबी आहे. आम्ही देखील मराठा आहोत. मराठा हे नाव एका जातीचे नव्हे, धर्माचे नाही, पंथाचे नाही. संपूर्ण महाराष्ट्र मुलुखाचे आहे. महाराष्ट्रात जे जे राहता ते सर्व मराठे आहेत. चुकून त्यांनी मराठी लिहिले. त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालं नाही. मात्र आता आंदोलन हे मागे घेतले पाहिजे अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
मुंबईतील ओपन डेस्क बससेवा चालूच राहणार
नाशिक मधील तलाठी परीक्षेत कॉपीचा प्रकार उघडकीस