Mufti Shah Mir Killed : पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मुफ्ती शाह मीर याची गोळ्या झाडून हत्या केली असून याच मुफ्तीने कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात महत्वाची बजावली होती. मुफ्ती मशिदीमधून नमाज पडून बाहेर निघाला होता. त्यावेळी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मुफ्ती हा मानवी तस्करीत सुद्धा सहभागी होता. मुफ्ती शाह मीर हा अनेक वर्षांपासून पाकिस्तानी लष्करासाठी हेरगिरी करत होता. त्याचे ISI या पाकिस्तानी संघटनेशी देखील चांगले संबंध होते. मुफ्ती शाह मीर हा बलूच भागातील माहिती, टीप तो लष्कराला देत होता. त्यावंगबरोबर तो जमियत-उलमा -ए-इस्लाम नावाच्या एका इस्लामी कंट्टरपंथीय राजकीय गटाचा सदस्य सुद्धा होता.
कुलभूषण जाधव यांना अटक
भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांचे मार्च, 2016 मध्ये अपहरण करण्यात आले मात्र जाधव हे भारतीय गुप्तहेर असल्याचा ठपका लावत पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना अटक केल्याचे सांगितले. कुलभूषण जाधव हे रिसर्च अँड एनिलिटिक RAW या संस्थेसाठी काम करत असल्याचे पाकिस्तानने सांगितले. म्हणूनच भारत सरकारने जाधव यांचे इराणमध्ये अपहरण करून त्यांना बलूचिस्तानमध्ये अटक केल्याचा पाकिस्तानचा बनाव असल्याचा दावा केला होता.
भारताने खोटे मत फेटाळले
पाकिस्तानने एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये जाधव यांनी कथितपणे कबूल केले की ते भारतीय गुप्तचर संस्था रॉसाठी काम करत होते आणि बलुचिस्तान त्याचबरोबर कराचीमध्ये अस्थिरता पसरवण्यात सहभागी होते. तथापि, भारताने ते नाकारले आणि ते जबरदस्तीने केलेले विधान आहे असे म्हटले.
भारताचे ठाम मत
भारताने म्हटले की, पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांनी जाधव यांचे इराणमधून अपहरण केल्याचा दावा केला. कुलभूषण जाधव हे निवृत्तीनंतर इराणमध्ये व्यवसाय करत होते. जाधव यांच्यावर पाकिस्तानी लष्करी न्यायालयात खटला चालवण्यात आला. १० एप्रिल २०१७ रोजी लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी, दहशतवाद आणि देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. भारताने या निर्णयाचा तीव्र निषेध केला आणि सरकारवर या प्रकरणात पारदर्शकता न ठेवल्याचा आरोप केला.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आणि अंतिम निकाल येईपर्यंत त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आदेश दिले. जुलै २०१९ मध्ये, आयसीजेने भारताच्या बाजूने निकाल दिला आणि पाकिस्तानला जाधव यांच्या शिक्षेचा आढावा घेण्याचे आणि निष्पक्ष खटला चालविण्याचे निर्देश दिले. सध्या कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत.
हे ही वाचा :
Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या- नवनीत राणा
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.