spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोधाची धार अजून तीव्र

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरेल असा दावा करण्यात येणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरेल असा दावा करण्यात येणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. परंतु, काही नेते मंडळी केवळ टक्केवारीवर डोळा ठेऊन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण कारण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या विरोधाची धार अजून तीव्र झाली आहे. त्यातच आता विधानसभा निवडणूक काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प होणार नाही असे आश्वासन दिले होते.

निम्न पैनगंगा प्रकल्पाला १९९५ मध्ये मंजुरी मिळाली होती. परंतु मंजुरी मिळाल्यानंतरच या प्रकल्पाला प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला. प्रकल्पाच्या रद्द करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी अनेक आंदोलने केली. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. या प्रकल्पामुळे दीड लाख लोकसंख्या असलेली ९५ गावे विस्थापित होणार आहे. एक नव्हे तर २८ वर्षांपासून या प्रकल्पाला विरोध होत आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यापासून मुख्यमंत्री पर्यंत निवेदन देण्यात आली होती. ११२ लोकांवर केसेस दाखल आहेत. २८ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच स्थानिक नागरिकांचा विरोध होता. पुनर्वसनाचे कायद्यानुसार, प्रकल्पाच्या उभारणीसाठी पुनर्वसन पूर्ण होणे आवश्यक असते. परंतु आजपर्यंत शासनाने एकही गावाचे पुनर्वसन पूर्ण केले नाही. विदर्भातील खडका आणि मराठवाड्यातील खंबाळा या गावांची ९० टक्के शेतजमीन खरेदी केली असली तरी या गावांचे पुनर्वसन २८ वर्षांनंतरही पूर्ण करु शकले नाही. प्रकल्पाच्या विरोधात ९५ गावांचे नागरिक प्रचंड विरोध करत आहेत. प्रकल्पाच्या समर्थनार्थ असलेल्या लोकांची संख्या अत्यल्प आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नाही तर मरणाच्या दारात नेणारा आहे, यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत प्रकल्प रद्द करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आश्वासन देऊन केवळ आपल्या आर्थिक लाभासाठी प्रकल्प पूर्ण करण्याचा घाट घालणाऱ्या त्या नेत्याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. शेतकरी सुखी होईल, विस्थापित होणार नाही असे त्यांनी सांगितले होते. प्रकल्प बंद करण्याचे आश्वासन पूर्ण करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

शेती आमची संपत्ती आहे. धरण हे मरण आहे. शेतीच्या भरोशावर मुलांचे शिक्षण सुरु आहे. शेती गेल्यास एक पिढी जगेल पुढच्या पिढीचे काय होईल ती कशी जगेल. बेरोजगार युवकांना सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा. बुडीत क्षेत्रात शेत जमिनी येत आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. मुलांच्या हाताला रोजगार नाही. खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु करावे. प्रकल्प झाल्यास शंभर टक्के लोक बेघर होतील. रामपूर हे गाव किनवट तालुक्यात मराठवाड्यातील लाभक्षेत्रात येते. गावातील ८०  टक्के शेती सिंचनाखाली आहे. प्रकल्पाची आम्हाला गरज नाही. गावातील विकास कामे थांबवण्यात आली आहेत. कुणाच्या हितासाठी प्रकल्प करण्याचा अट्टाहास सुरु आहे अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांना दिल्या आहेत.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss