spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

अखिल भारतीय साहित्य संमेलनाची रूपरेषा ठरली; शरद पवारांनी दिली संपूर्ण माहिती…

आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेला आहे. राजधानी दिल्लीत हा साहित्य संमेलन पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. या संमेलनाची तयारी आणि याबद्दलची माहिती देण्यासाठी दिल्लीत पत्रकार परिषद शरद पवारांनी घेतली. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

मुख्य सभागृहाला देण्यात आलं आंबेडकरांचं नाव
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. लोकमान्य टिळक आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रवेशद्वार राहणार असेल. या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती शरद पवारांनी दिली. यावेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीतील ५ हजार साहित्य प्रेमी उपस्थित राहणार आहेत. तर २५०० प्रतिनिधी महाराष्ट्रातून येणार आहेत, १५०० लोकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडी निघणार आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

मोदींची कार्यक्रमाला यायची इच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही आधीच निमंत्रण दिलं. त्यांच्या सचिवांचा फोन आला. वेळ कळवणार आहेत. सकाळी की दुपारी येणार हे सांगतील. त्यांना एक विनंती केली की, पंतप्रधानांचं निश्चित झालं तर आम्ही विद्या भवनात कार्यक्रम घेऊ. एक दोन दिवसात आम्हाला याबाबतची माहिती मिळेल. मोदींची कार्यक्रमाला यायची इच्छा आहे. सकाळीच हवी का? दुपारी आलेलं चालेल का? असा प्रश्न मोदींनी विचारला. त्यामुळे ते येणार असं आम्ही गृहित धरलं आहे. मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांची संमती आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोललो नाही. त्यांना निमंत्रण देणार आहोत, असेही शरद पवारांनी सांगितले.

पुढे ते बोलले, पाकिस्तानातील मराठी भाषिकांनी साहित्य संमेलनाला यायची इच्छा व्यक्त केली आहे. पण हा प्रश्न सोपा नाही. परराष्ट्र मंत्रालयाशी बोलावं लागेल. सरकारचं कन्फर्मेशन मिळेल की नाही हे सांगू शकत नाही. साहित्य संमेलनाचा संबंध नाही. पण जगातील कित्येक संघटनाचा अध्यक्ष होतो. माझ्या अनेक बैठका रावळपिंडी आणि कराचीत बैठका व्हायच्या. कराचीत मुंबईतील लोक भेटायचे. १०० लोकांची महाराष्ट्र मंडळ नावाची संस्था आहे. कराचीत आहे. विशाल राजपूत हे मुख्य आहेत. सिंध प्रांतात एक हजार लोक राहतात. अजून वक्त वाढतील. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या नंतरचं हे दिल्लीतील पहिलं संमेलन आहे. शरद पवार यांचा साहित्याशी आधीपासूनचा संबंध आहे. त्यामुळे ते स्वागत अध्यक्ष होतील, असेही शरद पवार म्हणाले

हे ही वाचा:

छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज का? Suhas Kande यांचा भुजबळांवर हल्लाबोल

अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या कथित विधानानंतर संसद दणाणली; विरोधक आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss