spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

फोनवरील व्यक्तीने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख… Indrajeet Sawant यांना धमकीचा फोन

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला आहे. याची माहिती स्वत: इंद्रजीत सावंत यांनी दिली असून धमकीचा ऑडिओ हा आपल्या फेसबुक अकांऊटवरून शेअर केला आहे. हा कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Indrajeet Sawant & Devendra Fadnavis: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला आहे. याची माहिती स्वत: इंद्रजीत सावंत यांनी दिली असून धमकीचा ऑडिओ हा आपल्या फेसबुक अकांऊटवरून शेअर केला आहे. हा कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना काल रात्री साधारण रात्री १२ वाजता धमकीचा फोन आला. फोनवरील व्यक्ती शिव्या घालून जातीवाचक बोलत होती. हा महाराष्ट्र पेशव्यांचा होत आहे का? अशी खंत वाटते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मी एका विशिष्ट समाजाचा आहे असा कधी उल्लेख केला नाही. फोनवरील व्यक्तीने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. राज्याच्या गृहमंत्रालयाकडून यावर कारवाई करण्यात यावी. मला धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा व्यक्तीवर कारवाई करतील. संबधित व्यक्तीची मोठ्या नेत्यांबरोबर उठबस आहे. त्यांनी यावर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत हा संदेश द्यावा, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले. तसेच, फोनवरील व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा या व्यक्तीने आरोप केला आहे. यासोबतच घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा’, असं म्हणत इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली आहे.

अशा पद्धतीच्या धमकीला भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्यास मी समर्थ आहे, माझे नातेवाईक, सहकारी सक्षम आहेत फोनवरील व्यक्तीने मला घरात घुसून मारण्याची धमकी दिली.छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मी कसा बदलू शकतो. त्यांचा खोटा आणि घाणेरडा इतिहास मी सांगावा, अशी काहीजणांची इच्छा आहे. पण मी खरा इतिहास सांगण्यापासून कधी मागे हटणार नाही. उलट दहा पावले पुढे जाऊन इतिहास सांगेन, असा निर्धार इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत (Indrajeet Sawant) यांनी व्यक्त केला. इंद्रजित सावंत यांना फोनवरुन एका व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर इंद्रजित सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.

इंद्रजीत सावंत यांना मी ओळखत नाही, त्यांना कधीच फोनवर संपर्क ही साधलेला नाही, त्यामुळे इंद्रजीत सावंत यांना देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण प्रशांत कोरटकर यांनी दिला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जी कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांनी पोस्ट केली आहे. त्या कॉल रेकॉर्डिंगमधील आवाजही माझा नाही, असा दावाही प्रशांत कोरटकर यांनी केला आहे.इंद्रजीत सावंत यांनी फेसबुक पोस्ट करून माझा नाव वापरण्यापूर्वी किमान माझ्याशी संपर्क साधायला हवा होता. किंबहुना त्यांना आलेला कॉल मीच केला आहे की नाही याची शहानिशा करायला हवी होती. त्यांनी असं काहीही न करता फेसबुक पोस्ट करून माझी बदनामी तर केलीच आहे. सोबतच मला सकाळपासून अनेक धमकीचे कॉल येत आहेत. त्यामुळे मी इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात पोलिसांकडे आणि सायबर सेलमध्ये तक्रार करेल असंही प्रशांत कोरटकर म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्य आहेत, त्यांच्याबद्दल चुकीचे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी इतिहासाचा विद्यार्थी असलो तरी इतिहास विषयाचा तज्ञ नसल्यामुळे इंद्रजीत सावंत सारख्या इतिहास तज्ञाला फोन करून वाद घालण्याचा प्रश्नही उद्भवत नसल्याचे कोरटकर म्हणाले.

हे ही वाचा:

Rashmika Mandanna: साऊथ अभिनेत्री रश्मीका मंदानाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, ५ महागड्या गाड्या

Amol Kolhe: स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट का गुंडाळण्यात आला? अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss