spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता

मराठा आरक्षणचा (Maratha Reservation) मुद्दा आता सगळीकडेच तापला आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणासाठी बसले होते.

मराठा आरक्षणचा (Maratha Reservation) मुद्दा आता सगळीकडेच तापला आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणासाठी बसले होते. यावेळी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारकडे मागणी केली. ‘ मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे ‘ अशी त्यांची मागणी आहे. पण राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी नागपूर मध्ये बोलताना म्हंटले आहे ‘ कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार नसल्याचं त्यांनी विधान केले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाहीच असं म्हटले आहे. १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीगर मध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या वक्त्यव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘ आम्ही ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. पण आंदोलकांची मागणी ओबीसीमधून आरक्षण देण्याची आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला गेला. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, “समाजाची दिशाभूल होता कामा नये. जरांगे पाटील यांची मागणी काय आहे, ज्यांची नोंदी पूर्वी निजामकालीन असतील. ज्यांच्यावर कुणबी नोंद असेल आणि नंतर ती बदलली असेल तर त्याचा सर्व्हे केला पाहिजे. अशा लोकांची माहिती मिळवली पाहिजे आणि खरच कुणबी असेल तर त्याला ओबीसी यांना देखील काहीच आक्षेप नाही. पण, त्यांचा सरसकट मराठ्यांना दाखला देण्यावर आक्षेप आहे. तसेच अशी कोणतेही भूमिका, कोणताही विचार राज्याची नाही की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येईल. ओबीसी समाजाचा आरक्षण आहे तेवढंच ठेवून, मराठा समाजाचे रद्द झालेलं आरक्षण मिळवून देण्याची मागणी मराठा समाजाची आहे. त्यामुळे ते आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, यासाठी सरकारचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.”

जालना मधील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे बसले होते. त्यांना हे आंदोलन मुख्यमंत्री शिंदे यांनी करायला सांगितले असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. या टीकेवर बोलताना शिंदे म्हणाले ‘ “नाना पटोले यांना सध्यातरी कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांची तडफड आहे की, असा काहीतरी गंभीर आरोप केल्यावर त्यांची दखल घेतली जाईल. नाना पटोले माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे की, यामध्ये एकनाथ शिंदे यांचा किंचित तरी हात आहे का?, पोटात एक आणि ओठावर एक असे मी काम करत नाही.” असे शिंदे म्हणाले.

हे ही वाचा: 

गणपतीच्या आठवड्यात येणाऱ्या उपवासाचे महत्व तुम्हाला माहित आहे का?, जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबईतील मानाच्या गणपतीचे मुखदर्शन सोहळा पडला पार; मुंबईचा राजा, गिरगावचा राजा….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss