देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (HSRP) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांसाठी हे नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणेच आहे. राज्यात एचएसआरपी (HSRP) लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. उच्चाधिकार समितीने कंपन्यांचे दर अंतिम केले आहेत. मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले. राज्यात ठरवून दिलेले दर हे ‘एचएसआरपी ‘ नंबर प्लेट व फिटमेंट चार्जेससह आहेत.
अन्य राज्यात जीएसटी वगळून दुचाकीचे दर प्रतिवाहन ४२० ते ४८० रुपये, तीन चाकी वाहन ४५० ते ५५०, चार चाकी वाहन व जड वाहने ६९० ते ८०० रुपये आहेत. तर राज्यामध्ये जीएसटी वगळून दुचाकी प्रतिवाहन ४५० रुपये, तीन चाकी ५००, चार चाकी व जड वाहने ७४५ रुपये आहे. यावरून राज्यातील दर अन्य राज्यांमधील दरांप्रमाणेच असल्याचे दिसून येते. केंद्रीय मोटार नियम १९८९ चे नियमानुसार सर्व वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ‘ बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून ०१एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक आहे. तसेच काही राज्यातील दर फिटमेंट चार्जेसशिवाय आहेत. या दरांची माहिती भारतीय वाहन उद्योगाच्या एसआयएएम (SIAM) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे नेमकं काय?
HSRP ही एक व्हेईकलची लायसन्स प्लेट आहे. ज्याच्यामध्ये छेडछाड करता येत नाही, कोणताही बदल करता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं डुप्लिकेट सुद्धा करता येत नाही. आता या HSRP मध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. एक होलोग्राम असतो आणि रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा असतो. हे नंबर प्लेट ॲल्युमिनियम सारख्या टिकाऊ मटेरियल पासून बनवलेली आहे आणि त्यावर हॉट स्टॅम्प केलेला अल्फा न्यूमेरिक कोड आहे. सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातो. हॉलोग्राम स्टिकर प्लेटवरती अशोक स्तंभ असलेला होलोग्राम सुद्धा आहे. जो क्रोमियम वरती आधारित आहे. प्रत्येक वाहनांसाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे, तो सहज काढता येत नाही.
गाडीला HSRP नंबर प्लेट नसेल तर?
तुमच्या गाडीची चोरी झाली तर अशा वेळेस ती गाडी शोधणं अवघड होतं किंवा त्या गाडीचा वापर एखादा गुन्हा करण्यासाठी झालेला असेल तर अशा वेळेस सुद्धा तपास कार्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वच नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लागू करण्यात आलेली आहे. पण जुन्या वाहनांना सुद्धा आता हे HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट याची सक्ती केली जाणार आहे. ज्यांच्या गाडीला HSRP नंबर प्लेट नसेल त्यांना ३१ मार्च नंतर दंडात्मक कारवाईला सामोर जावं लागणार आहे.
हे ही वाचा:
Mumbai Megablock: पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर आजपासून २ दिवसीय मेगाब्लॉक