बापाने हट्ट पूर्ण केला नाही म्हणून मुलाने गळफास लावून स्वत:चं आयुष्य संपवलं. मुलाने ज्या दोरखंडाने गळफास घेतला, त्याच दोरखंडाने वडिलांनीही स्वतः ला गळफास लावून घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात मिनकी येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. ओमकार असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव असून, तो फक्त 16 वर्षांचा होता. तर राजेंद्र पैलवार ४३ वर्ष असं आहे.
दरम्यान, पैलवार कुटुंब हे आर्थिक अडचणीत होतं. नुकतेच त्यांचे दोन्ही मुलं सुट्टीत घरी आली होती. उदगीर शहरात मुलं शिकायला ठेवी असल्यानं पैलवार कुटुंबावर खर्चाचा ताण पडत होता असं समजतंय. तसंच या कुटुंबावर कर्ज असल्याचीही माहिती समोर आली आहे. घरी आलेल्या ओमकारने वडिलांना बुधवारी 8 जानेवारीरोजी आपल्या वडिलांकडे मोबाईल घेण्यासाठी पैसे मागत होता. तसंच त्याने शालेय साहित्य आणि कपड्यांसाठी पैसे मागितले होते. पण पैसे नाहीत, थोडे दिवस थांब नंतर देतो, असं वडिलांनी सांगितलं. त्यामुळे नाराज झालेल्या ओमकारने हे टोकाचं पाऊल उचललं.
मुलगा घरी न आल्यामुळे वडिलांनी शोधाशोध केली, तेव्हा शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन ओंकारने जीवन संपवल्याचं त्यांना दिसलं. हे पाहून हतबल झालेल्या वडिलांनी मुलान ज्या दोरखंडाने गळफास लावून घेतला, त्याच दोरखंडाने आणि त्याच झाडाला गळफास लावून घेऊन स्वत:ला संपवलं. या घटनेनं गावात दुःख व्यक्त केला जात आहे.