spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

लेक अमेरिकेत मृत्यूशी झुंझ देत आहे आणि बाप व्हिसासाठी वणवण करत आहे; मंत्र्यांच्या बंगल्याच्या पायऱ्या देखील झिजवल्या

नुकताच काही दिवसापूर्वी बातमी आली होती की एका माजी मंत्र्याच्या मुलाला थांबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करुन चक्क हवेतूनच विमान वळविण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र एका सर्व सामान्य लोकांसाठी यंत्रणेपुढे सातत्याने चपला झिजवाव्या लागतात हेही तितकेच खरंय.अशीच एक घटना समोर आली आहे. मरणाच्या दारात असलेल्या मुलीला वाचविण्यासाठी, तिच्या भेटीसाठी अमेरिकत जाऊ इच्छिणाऱ्या तिच्या बापाला मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नाही आहे. लेकीला पाहण्यासाठी बापाला मंत्र्यांच्या बंगल्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.

नीलम शिंदे या ३५ वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत गेल्या ११ दिवसापूर्वी अपघात झाला. तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. नीलम ही सातारा जिल्ह्यातील उंब्रज गावातील रहिवासी आहे. मरणाच्या दारात असताना तिच्याजवळ जाण्यासाठी तिच्या पालकांना भारतातून व्हिसा मिळत नाही आहे. वडिलांनी निराशा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे वडिल तानाजी शिंदे यांनी यासाठी अनेक मंत्र्यांच्या घराच्या पायऱ्या झिजवल्या आहेत.

तानाजी शिंदे यांनी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून व्हिसासाठी संपर्क केला. तर, मुंबईतील कुर्ला येथे पासपोर्ट व्हिसा आँफिसलाही पालकांनी भेट दिलीय. पण व्हिसासाठी त्यांना दाद मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील हॉस्पिटलने अपघातानंतर नीलांच्या पालकांना पत्र देखील दिलं आहे, ज्या आधारे ते व्हिसासाठी मागणी करत आहेत. मात्र, व्हिसा मिळत नसल्याने वडिलांच्या हतबलतेकडे आता सरकार देईल का, हाच खरा प्रश्न आहे.

१४ फेब्रुवारी २०२४ रोजी व्यायामासाठी चालताना एका चारचाकी गाडीने नीलमला पाठीमागून जोरदार धडक दिली. आणि अपघात झाला. या अपघाताची दोषी असलेल्या कर चालकाला पोलिसांनी पकडले आहे. मात्र रक्तातील नातेवाईक आल्याशिवाय याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल होत नसल्याचे पोलीस सांगत आहे. या अपघातात नीलमच्या दोन्ही हातांना, पायांना आणि डोक्याला दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने ती कोमातील स्थिती असल्याचे डाक्टर सांगत आहेत. तिची रूममेट खुशी ही महाराष्ट्रातील असून तिच्याकडून उंब्रजमधील पालकांना याबाबत माहिती मिळत आहे. मात्र, वडिल तानाजी यांना मुलीच्या भेटीसाठी हवा असलेला इमर्जन्सी व्हिसा मिळत नाहीय.

Latest Posts

Don't Miss