ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण करावं, इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. या उपोषणादरम्यान कुणाला काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल अशा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. त्यामुळे रविवारपासून राज्यातील वातावरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली वेळ संपली आहे. त्यानंतर आता जरांगे यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे.
जालन्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलं असून आता यापुढे अन्न, पाणीच काय तर उपचारही घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतर आता या आंदोलनाचे लोन राज्यभर पसरताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून राज्यभर आरक्षणासाठी आंदोलन सुरू करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
40 जण मोबाईलच्या टॉवरवर चढले
राज्यात मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला धार आणखी वाढली आहे. जालन्यात ठिकठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन सुरु आहे..जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर मराठा आंदोलकांनी चक्का जाम आंदोलन केलं. आरक्षणाची मागणी करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दुसरीकडे रोहिलागड गावात 40 जणांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. मराठा आरक्षणाचा जीआर काढून मनोज जरांगेंचं आंदोलन थांबवावं अशी मागणी आंदोलकांनी केली.
हे ही वाचा :
आता ‘iPhone’ ही होणार ‘मेड इन इंडिया’ (Made in India)
संजय राऊतांनी फडणवीसांनी डिवचलं, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो कारण…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा