spot_img
spot_img

Latest Posts

कुणबी नोंदी शोधण्यासाठी गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले

राज्यभरात आता मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे उपोषणासाठी बसले होते.

राज्यभरात आता मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे उपोषणासाठी बसले होते.मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मनोज जरांगे यांनी मागणी केली आहे. या पार्शवभूमीवर सरकारच्या मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाच्या नोंदी शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) विभागीय आयुक्त कार्यालयाकडून याबाबतीत सर्वच संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. कुणबी मराठा समाजाच्या नोंदी निजामकालीन असल्याची माहिती घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक १३ सप्टेंबर रोजी हैदराबादला (Hyderabad) रवाना झाले होते. पण या दौऱ्यातून काही हाती न लागल्याची माहिती समोर आली आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले असले तरी साखळी उपोषण सुरुच ठेवले आहे. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. राज्य सरकारने निजामकालीन नोंदी शोधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाचे एक पथक हैदराबादला पाठविले होते. मात्र, पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचे एक पथक तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये १९६७ पूर्वीच्या निजामकालीन ‘कुणबी’ अशा नोंदी असलेली माहिती घेण्यासाठी विभागीय अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्या नेतृत्वात हे पथक १३ सप्टेंबर रोजी हैदराबादला गेले होते. पण यामध्ये त्यांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागला नाही.

हैदराबादमध्ये गेलेल्या पथकाने सर्व प्रकारचे रेकॉर्ड तपासून पहिले. पण त्यातून कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. १९३१ पूर्वीच्या जनगणनेची घरयादी मिळाली नाही. पण ती यादी महत्वाची होती. सापडलेल्या दस्त ऐवज मध्ये फारशी माहिती दिली गेली नाही. दस्तऐवजांचा मजकूर समजण्यासाठी गुगल ट्रान्सलेशन वापरले. मात्र, ते तंतोतंत जुळत नाही. परंतु त्या दस्तऐवजामध्ये कुणबीचा संदर्भ आढळला नाही. एकूण सनदची ( मुन्तकब) संख्या १२०० च्या आसपास आहेत . त्यातील १ हजार सनद राज्यातील असतील. त्यात मुस्लिमांना जास्त सनद दिल्याचे आढळले आहे.

हे ही वाचा: 

पश्चिम रेल्वे मार्गावर मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल

“सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२३

FOLLOW US

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss