Monday, December 4, 2023

Latest Posts

माणसाची अजब करामत! एक, दोन नव्हे तर चोरल्या तब्बल सहा रिक्षा, कारण ऐकून व्हाल थक्क

माणसाची अजब करामत! एक, दोन नव्हे तर चोरल्या तब्बल सहा रिक्षा, कारण ऐकून व्हाल थक्क

लहानपणापासूनच आपल्याला कोणतीही गोष्ट चोरी करू नये असं सांगितलं जातं कारण चोरी करणं ही काही चांगली गोष्ट नाही. मग ती गोष्ट किती ही मोठी असो किंवा किती ही छोटी. चोरी करणं हे वाईटच, पण बरेच जण पोटा-पाण्यासाठी चोरीसारखा चुकीचा मार्ग निवडतात. पण काही लोकं असेही असतात जे स्वतःच्या स्वार्थासाठी, ऐशोरामासाठी, चोरी आणि लुटमारी करतात अगदी दरोडेही टाकतात. पैश्यांचा हव्यास,आरामशीर, आणि निवांत आयुष्यासाठी चोऱ्या माऱ्या करून चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणरे हे भामटे चोर कधी ना कधी कायद्याच्या कचाट्यात सापडतातच आणि त्यांचा बरोबर कायदयाने बंदोबस्त देखील होतो.

असाच एक अजब करामत करणारा चोर नवी मुंबई पोलिसांनी पकडला आहे, त्याने एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल सहा रिक्षा चोरी केल्याचे यातून समोर आलेलं आहे. पण पोलिसांनी त्याची काटेकोर चौकशी केल्यानंतर त्याने चोरी करणायचं जे कारण सांगितलं ते ऐकून पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला आणि हे कारण जर तुम्हीदेखील ऐकलं तर तुम्हीदेखील डोक्याला हात लावून चक्क व्हाल.

या कारणासाठी केली रिक्षांची चोरी

एका रिक्षा चोरीची तक्रार तुर्भे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी तपास केल्यानंतर शिळफाटा येथून एका इसमाला रिक्षासोबत ताब्यात घेण्यात आलं. मुंब्रा येथील रहिवासी असलेला अश्रफ खान याची पोलिसांनी कसून चौकशी केली . त्यानंतर ,चोरीचं एक वेगळंच प्रकरण समोर आलं.
त्याने सांगितलं की फिरायला जाण्यासाठी त्याने या रिक्षा चोरल्या, बाहेर फिरायला जाताना इतर वाहनांमधून जाणं त्याला परवडायचं नाही, त्यामुळेच जवळपासच्या परिसरातील रिक्षा चोरून त्यातून फिरायला आवडायचं असं अश्रफने पोलिसांना सांगितले.त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सगळ्या सहा रिक्षा ताब्यात घेतल्या असून त्यावर अजून काही चोरीचे प्रकरण आहे का यासंदर्भात पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

हे ही वाचा : 

कांद्याला दराची ‘झळाळी’, शेतकरी दु:खी

‘श्यामची आई’ चित्रपटाचा ब्लॅक अँड व्हाइट ट्रेलर  प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss