धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. काय चाललंय मित्र असा आवाज दिल्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेली माहिती अशी, धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गोविंदपूर या ठिकाणी एक तरुण मटणाच्या दुकानाच्या बाजूला बसला होता. यावेळी एका तरुणाने त्याला कसं चाललंय मित्रा, काय चाललंय मित्रा असं म्हणत आवाज दिला. मात्र काय चाललंय मित्रा म्हणून नाव घेत आवाज दिल्याच्या रागातून त्याला संताप अनावर झाला. या संतापामुळे एका मित्राकडून दुसऱ्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
यावेळी त्या संतापलेल्या तरुणाने मटण कापण्याच्या सत्तुरने त्याच्या मित्रावर सपासप वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. यात त्याचा हात निकामी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यानंतर तरुणाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. उपचारानंतर जखमी तरुणाचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्टीकरण पोलीस विभागाकडून देण्यात आले आहे.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत