spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही, निकालानंतर चर्चा करुन निर्णय घेऊ – Ramesh Chennithala

Vidhansabha Election 2024: गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. २० नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सर्वांनाच २३ नोव्हेंबर अर्थात निकालाच्या दिवसाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर ‘एक्झिट पोल्स’चे अंदाज आले. जवळपास सर्वच पोल्सनुसार महायुतीची सत्ता पुन्हा येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. महाविकास आघाडीही बहुमतापासून किंचित लांब असल्याची शक्यता पोल्सनुसार वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरच निकालाचे खरे चित्र समजू शकेल. मात्र तत्पूर्वी ‘एक्झिट पोल्स’नी पक्षनिहाय जे अंदाज व्यक्त केले आहेत, त्यावरून काँग्रेस तयारीला लागले आहे.अशातच, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल व स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीला बहुमत मिळणार 

टिळक भवन येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता काँग्रेस (Congress) व महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) च्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. विधानसभेला जास्त मतदान झाल्याचा फायदाही काँग्रेस महाविकास आघाडीलाच होईल. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे त्रिशंकु विधानसभेचा प्रश्न उद्भवत नसल्याचे मत चेन्नीथला यांनी व्यक्त केले. निवडून आलेल्या आमदारांना काँग्रेस (Congress) पक्षाने हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे का, यावर बोलताना चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेसचे आमदार कठीण परिस्थितीतही पक्षासोबत राहिले आहेत त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही, असेही चेन्नीथला म्हणाले.

मुख्यमंत्रीपदावरून वाद नाही

माध्यमांशी संवाद साधतांना रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांना मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या प्रश्नावर रमेश चेन्नीथला म्हणाले की, मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही, निकालानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील.

हे ही वाचा:

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर केली नारायण राणेंनी टीका…

Vidhansabha निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पंढरपुरात प्रतिबंधक आदेश व वाहतूक नियोजन आदेश जारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss