spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

सप्टेंबर महिन्यात होणार हे मोठे बदल, गॅस सिलेंडरच्या दरात २०० रुपयांनी घट

प्रत्येक महिन्यांप्रमाणे येणाऱ्या सप्टेंबर २०२३ महिन्यात काही मोठे बदल होणार आहेत. प्रत्येक महिन्यात काहींना काही बदल होत असतात.

प्रत्येक महिन्यांप्रमाणे येणाऱ्या सप्टेंबर २०२३ महिन्यात काही मोठे बदल होणार आहेत. प्रत्येक महिन्यात काहींना काही बदल होत असतात. यामुळे तुमच्या आमच्या जीवनात व्यवहारामध्ये आणि महिन्याच्या बजेटमध्ये परिणाम दिसून येतो. स्वयंपाक घरापासून ते शेअर मार्केटपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये बदल होत असतात. नोकरदार वर्गामध्ये देखील हे बदल होणार आहेत. त्यासोबतच नोकरदार वर्गाच्या टेक होम सॅलरीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्या सोबतच देशातील काही काम पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर महिना हा शेवटचा असणार आहे. चला तर पाहुयात नेमके कोणते बदल येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात होणार आहेत.

मागच्या वर्षापासून गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली होती. पण येत्या सप्टेंबर महिन्यात देशातील ऑईल आणि गॅस वितरण कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतीमध्ये बदल करणार आहेत. आता १ सप्टेंबर पासून गॅसची किंमत कमी होणार आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये केंद्र सरकारने दोन दिवस आधीच बदल केले आहेत. घरगुती वापरातील गॅस सिलेंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांसाठी गॅसची किंमत कमी करण्यात आली आहे.

आयपीओ (IPO) बंद झाल्यानंतर बंद झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या स्टॉक्सची लिस्टिंग होण्याची वेळ मर्यादा ३ दिवसांपर्यंत केली आहे. यापूर्वी ती सहा दिवसाची होती. या नवीन नियमामुळे आयपीओ जारी करणाऱ्या कंपन्यांसोबतच इन्वेस्टमेंट करणाऱ्यांना फायदा होणार आहे. SEBI ने यासंदर्भात सूचना जारी केली आहे. १ सप्टेंबर २०२३ पासून येणारे सर्व आयपीओ धारकांसाठी हे नवीन नियम लागू होणार आहेत. तसेच १ सप्टेंबर पासून सर्व कंपन्यांना नवीन नियम लागू करणे बंधनकारक आहेत.

एलपीजीच्या किमतीसोबत एअर फ्यूएलच्या (Air fuel) दरात महिन्याच्या पहिल्याच तारखेला बदल होणार आहेत. या वेळेस पहिल्याच दिवशी CNG-PNG च्या दरांत बदल केले जाऊ शकतात. याशिवाय सीनजी आणि पीनजी च्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. त्याचा परिमाण प्रवासापासून ते स्वयंपाक घरापर्यंत होण्याची शक्यता आहे.

१ सप्टेंबर पासून अॅक्सिस बँकेचे मॅग्नस क्रेडिट कार्ड (Magnus Credit Card from Axis Bank) वापरणाऱ्या ग्राहकांच्या कार्ड मध्ये बदल होणार आहेत. या कार्डच्या अटी शर्तीमध्ये बदल होणार आहेत. वेबसाईट्वर शेअर केलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यापासून ग्राहक काही व्यवहारांवर सवलतींचा लाभ घेऊ शकणार नाहीत. १ सप्टेंबरपासून नवीन कार्ड धारकांना शुल्क भरावा लागणार आहे, याची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.

येत्या सप्टेंबर महिन्यात बँकेला १६दिवसांची सुट्टी असणार आहे. बँकेसंबंधित तुमची काही कामे असतील तर ती या सुट्टीच्या आधी पूर्ण करून घ्या. RBI बँकेने सुट्टीची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या राज्यातील सणसमारंभानुसार सुट्ट्यांमध्ये बदल होतील. या महिन्यात कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी हे सण असणार आहेत. तर बँकांना दुसऱ्या आणि चोथ्या शनिवारी आणि प्रत्येक रविवारी सुट्टी असेल.

Latest Posts

Don't Miss