Republic Day 2025 । प्रजासत्ताक दिन (Republic Day) भारतात दरवर्षी २६ जानेवारीला साजरा केला जातो, हा दिवस भारतीय संविधानाची अंमलबजावणी १९५० मध्ये झाल्याची आठवण म्हणून महत्त्वाचा आहे. प्रजासत्ताक दिन २०२५ भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आहे, आणि हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण दिवस असेल. प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारी (Republic Day 2025) रोजी राजधानी दिल्ली (Delhi) येथे राष्ट्रपती (President), पंतप्रधान (Prime Minister) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परेडला (Parade) उपस्थित राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता या परेडला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मोठा बहुमान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका सरपंचाला मिळणार आहे. यंदाचा बहुमान रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडीच्या महिला सरपंच ममता जोशी यांना मिळाला आहे.
केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून ग्रामीण पातळीवर अनेक उपक्रम व अनेक योजना राबवण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी (Implementation), योजनांमध्ये असलेला लोकसहभाग (Public Participation), त्यासाठी केलेले प्रयत्न आदी निकष (Criteria) निश्चित करण्यात आले होते. या योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची निवड या उपक्रमासाठी (Initiative) करण्यात आली होती.
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी या ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता जोशी यांची निवड केंद्र शासनाकडून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणाऱ्या दिल्लीतील परेडसाठी विशेष अतिथी म्हणून करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून ग्रामीण पातळीवर अनेक उपक्रम व अनेक योजना राबवण्यात येतात. योजना व उपक्रम गावात पूर्ण क्षमतेने राबवून त्याचा लाभ नागरिकांना (Citizens) देण्यात आला आहे. त्यामुळेच या ग्रामपंचायतीला हा बहुमान मिळाला आहे.
सरपंच ममता जोशी काय म्हणाल्या?
” आमच्या पोमेंडी गावाचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे याचा मला अभिमान आहे. या गावची लोकनियुक्त सरपंच म्हणून हा बहुमान मला मिळाला. त्याबद्दल मला खूपच आनंद होत आहे.आजपर्यंत कधीही दिल्ली पाहिली नव्हती. आपण कधी दिल्लीत जाऊ असं वाटलं नव्हत. पण योजनांमधील नागरिकांचा सहभाग विविध उपक्रम यामुळे आमच्या ग्रामपंचायतची निवड शासनाकडून करण्यात आली आहे. याचा आनंद आहे.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत