बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी अरमाळ गावाच्या राज्य सरकारचा आदर्श युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या एका युवा शेतकऱ्याने तीन पानाची सुसाईड न लिहून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. युवा शेतकरी कैलास नागरे असं त्याचं नाव आहे.
गेल्यावर्षी, १५ डिसेंबर २०२४ रोजी कैलास नागरे यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील १४ गावांना खडकपूर्ण जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होत. मात्र त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नेहमी प्रमाणे त्यांची आश्वासन देऊन बोळवण केली.
ही आत्महत्या नसून सरकारने केलेला खून
शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार, गेले तीन महिने कैलास नागरे यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळेल या आशेवर काढली. मात्र नेहमीप्रमाणे शासनाची आश्वासने हवेतच विरली आणि ऐन होळी सणाच्या दिवशी कैलास नागरे यांनी तीन पानांची सुसाईड नोट लिहत विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून सरकारने केलेला खून असल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तर याप्रकरणी लवकरच शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही तर आम्ही सामूहिक आत्महत्या करू असा इशाराही मृतक शेतकरी कैलास नागरे यांच्या पत्नीने दिला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
राज्य शासनाने या शेतकऱ्याला नुकताच आदर्श शेतकरी पुरस्कार दिला पण त्याला सरकार न्याय देऊ शकले नाही. शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक झाले. सरकारला शेतकऱ्यांप्रती कुठलाही कळवळा नसून फक्त राज्यात जातीय तेढ या सरकारला निर्माण करायचं आहे अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
ही घटना ऐन होळीच्या दिवशी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सरकार शेतकऱ्यांना पुरस्कार देत मात्र न्याय देऊ शकत नाही अशी म्हणायची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.