spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

काँग्रेसच्या “या” वरिष्ठ नेत्या महापालिका निवडणुकांपूर्वी सोडणार पक्ष

पुढील तीन-चार महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागाणार आहेत,असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या निवडणुकांपूर्वीच नाशिक मध्ये काँग्रेस ला मोठा धक्का बसणार आहे. टीव्हीवरच्या डिबेट शो मध्ये दिसणाऱ्या काँग्रेसच्या राज्य प्रवक्त्या Hemlata Patil यांनी पक्ष सोडला आहे. फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आधी आपली नाराजी, मनातील खदखद बोलून दाखवली आहे. “तुम्ही ज्याला आपुलकीचा बंध समजता त्याच बंधाचा वापर तुमच्या भोवती आवळण्याचा फास म्हणून होतो. असा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात त्या पक्षाचा राजीनामा देणार आहेत. विधानसभा निवडणुकीपासूनच हेमलता पाटील ह्या नाराज होत्या. अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाकडून अन्याय झाला अशी त्यांची भावना आहे. “पक्ष नेतृत्वाने पूर्णतः दुर्लक्ष केलं. एकमेकांच्या कापाकापीतच पक्षाचे नेते मश्गुल आहेत” असे हेमलता पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केलेत. कुठल्या पक्षात जायचं, याबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याच त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्यची जागा ठाकरे गटाला दिल्यापासून हेमलता पाटील नाराज होत्या. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज सुद्धा भरला होता. मात्र, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा करुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. अखेर ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली. पण त्या काँग्रेस पक्षात त्या खुश नव्हत्या. विधानसभा निवडणूक लढू न दिल्यामुळे त्या नाराज होत्या. व यावर पक्ष श्रेष्टींनीं कोणतीही दाखल घेतली नाही.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि प्रवक्ते हेमलता पाटील यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या फेसबुक पोस्ट द्वारे त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. या पोस्टद्वारे त्यांचे पक्ष सोडण्याचे संकेत मिळाले होते. भावी राजकीय वाटचालीसाठी तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे, असे पोस्टमध्ये म्हटले होते. जेंव्हा तुमची निष्ठा, तुमचा प्रामाणिकपणा ही तुमची कमजोरी समजली जाते. तुम्ही ज्याला आपुलकीचा बंध समजता त्याच बंधाचा वापर तुमच्या भोवती आवळण्याचा फास म्हणून होतो तेंव्हा हा बंध झुगारणे हाच एकमेव मार्ग आहे, अशा विचारा प्रती मी आता पोहचलेय. तुम्ही माझ्या विचारांशी सहमत आहात का? अपेक्षा आहे माझ्या भावी वाटलाची साठी आपल्या अशिर्वादाची गरज आहे,असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलय.त्यामुळे त्या आता पक्षात जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

आत्ताची सर्वात मोठी बातमी, परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराडच्या आईच आंदोलन, म्हणाली ‘माझ्या लेकाने…’

वाल्मिक कराडला Mococa कायदा लावल्याने समर्थकांकडून आक्रमक भूमिका; परळी बंदची हाक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss