कालपासून म्हणजेच २३ डिसेंबर पासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या ताज्या अंदाजावर लक्ष ठेवून आवश्यक सावधगिरी बाळगावी आणि तयारी ठेवावी, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.
शेतकऱ्यांना कृषी विभागाने या स्थितीची तात्काळ दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीला मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची संरक्षण व्यवस्था, गारपीट प्रतिकारक उपाय, तसेच पिकांची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हवामानाच्या अंदाजाचे पालन करून पुढील नियोजन करण्याचे सुचवले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
२६ डिसेंबर – धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर
२७ डिसेंबर – नाशिक, पुणे, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम
हे ही वाचा:
शिंदेंचे शिलेदार नाराज; भाजपच्या मंत्र्यांना बंगले तर शिवसेनेच्या फ्लॅट ?
CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते संगीत मानापमान चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग