Saturday, April 20, 2024

Latest Posts

आज तिथीप्रमाणे Shivrajyabhishek Din, सोहळ्यासाठी सजला किल्ले रायगड

यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाच्या वर्षीचा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा हा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.

यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाच्या वर्षीचा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा हा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. तिथीनुसार राज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. हा सोहळा साजरा होण्यापूर्वी आज रायगडावर शिरकाई मंदिरात पूजा करण्यात आली आहे. आज दिनांक २ जून रोजी सकाळी ७ ते १२ या वेळेत किल्ले रायगडावर राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा संपन्न होत आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

आज संपूर्ण दिवसभरातील दिनक्रम –

  • सकाळी ७ वाजता ध्वजारोहन सोहळा
  • सकाळी ९ वाजता शिवराज्याभिषेक सोहळा
  • सकाळी १०.३० वाजता श्री शिवसन्मान सोहळा
  • सकाळी ११ वाजता शिवपालखी सोहळा

रायगड वरील शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा हा राज्य शासनामार्फत मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. तसेच येथे येणाऱ्या सर्व शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. तसेच आजपासून अनेक कार्यक्रमांचे आयोजन हे करण्यात आले आहे.

पाचाड येथे दिनांक १ ते ६ जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाहने या ठिकाणी ठेवल्यानंतर शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत १५० बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत. रायगडावर १० हजार लिटर आणि गडाच्या पायथ्याशी ४० हजार लीटर पाणीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २४ वैद्यकीय सेंटर्स तैनात केली जाणार आहेत. यात गडावर ६, पायऱ्यांवर ६ तर पायथ्याशी ७ आणि वाहनतळावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. रायगड किल्ले परिसरात जवळपास २ हजार पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेत आहेत. गडाच्या पायथ्याशी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परिसरात ३ हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करून ठेवता येणार आहे.

तसेच मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १६ टनपेक्षा अधिक अवजड वाहनांना महामार्गावर बंदी घातली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी ते पळस्पे, वाकण फाटा ते खोपोली व इतर राज्य मार्गावर वाळू रेती भरलेल्या ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांना बंदी आहे. ३१ मे ते २ जून रात्री १२ वाजेपर्यंत तसेच ४ जून रोजी ते ६ जूनपर्यंत ही बंदी असेल.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss