Friday, April 26, 2024

Latest Posts

आज नाशिक जिल्यात उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले

नाशिक जिल्यामध्ये पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे आता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दिवसेंदिवस उन्हाचे तापमान हे वाढत चालले आहे त्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत.

नाशिक जिल्यामध्ये पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे आता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दिवसेंदिवस उन्हाचे तापमान हे वाढत चालले आहे त्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. आज सकाळपासूनच काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणासह वादळी वारे वाहत होते. अशातच आता नाशिक शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. त्र्यंबकेश्वर शहरामध्ये तर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारच्या सुट्टीचा बेत आखात असलेल्या नाशिककरांवर पावसाने पूर्णविराम लावला आहे. आज सकाळीच नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता कमी होऊन ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे आज नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा कमी जाणवत होता.

नाशिकमध्ये प्रचंड उकाडा जाणवत होता आणि त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. अशातच आज सकाळपासून वातावरणामध्ये बदल जाणवत होते आणि संपूर्ण जिल्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही क्षणात पावसाला सुरवात झाली. यामध्ये त्र्यंबकेश्वरसह नाशिक शहर परिसरात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला आहे.

ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वाढलेला वेग यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील तापमानाचा पारा घसरला आहेत्यातच आक संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पायी दिंडी पालखी सोहळा नाशिक शहरात दाखल झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही तास नाशिक जिल्यामध्ये पाऊस येण्याची शकता नोंदवली जात आहे. नाशिकमध्ये साडे अकरा वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर लगेचच त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शहरवासीय सुखावले आहेत.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss