spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

पर्यटन व मत्स्य व्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

तारापोरवाला येथे सर्वात जुने मत्स्यालय असून पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तारापोरवाला मत्स्यालय विकासास तत्वतः मान्यता देत आहे. या उपक्रमाद्वारे मत्स्यलयाला आधुनिक स्वरूप देण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

विधानभवनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनवाढीबाबत उपयोजना संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी. एन.पाटील, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सूर्यवंशी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित होते.

तारापोरवाला येथे सर्वात जुने मत्स्यालय असून पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तारापोरवाला मत्स्यालय विकासास तत्वतः मान्यता देत आहे. या उपक्रमाद्वारे मत्स्यलयाला आधुनिक स्वरूप देण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, तारापोरवाला येथील मत्स्यालय मुंबईचे आकर्षण होते. त्यामुळे याला आधुनिक स्वरूप दिल्यास पर्यटन वाढीस मदत होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला बाह्य यंत्रणेद्वारे सहाय्यक जिल्हा पर्यटन अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन दृष्टीने प्रसिद्ध असलेले समुद्र किनाऱ्यावर शौचालय, लाईफ गार्ड ची सुविधा देण्यात यावी, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात- मंत्री नितेश राणे

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या समुद्रकिनारी पायाभूत सुविधा निर्माण केल्यास पर्यटन वाढीला मदत होणार आहे, असे मत मंत्री राणे यांनी व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गेस्ट हाऊसला खाजगी भागीदार (Public Private Partner) यांचा समावेश करून चालविण्याची परवानगी देण्याबाबत विचार करण्यात यावा. यासाठी एका गेस्ट हाऊसवर पायलट प्रोजेक्ट राबविण्यात यावे, अशी मागणी मंत्री श्री. राणे यांनी पर्यटन मंत्र्यांकडे केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनासाठी विशेष अनुदान देऊन विकास करण्यात यावा, असेही राणे यांनी सांगितले.

आगामी फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन वेंगुर्ला येथे करण्यासाठी पर्यटन विभागाने सहकार्य करावे, अशी मागणी मंत्री राणे यांनी पर्यटन विभागाकडे केले असून पर्यटन मंत्री यांनी यासाठी अनुकूलता दर्शवली आहे.

Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss