Wednesday, April 24, 2024

Latest Posts

राज्यात २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

आज महाराष्ट्रात २० आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज राज्यामध्ये पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आज महाराष्ट्रात २० आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज राज्यामध्ये पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांची देखील बदली करण्यात आली आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे आता साखर आयुक्त म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संजीव जयस्वाल स्वाल यांची बदली करण्यात आली आहे. परंतु यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वछता विभागाचे प्रधान सचिव पदाचा पदभार देखील कार्यक्रम राहणार आहे. तुकाराम मुंडे यांच्याकडे मराठी भाषा विभाग देण्यात आला आहे. कोणत्या अधिकाऱ्यांची बदली कोणत्या स्थानी झाली आहे ते खालीलप्रमाणे –

  • सुजाता सौनिक, IAS (१९८७ ) ACS (AR&OM), GAD, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
  • डॉ. सुधाकर शिंदे, IRS (१९९७) यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • एमएमआरडीएचे (MMRDA) आयुक्त असलेले एस. व्ही.आर. श्रीनिवास IAS (१९९१) यांच्याकडे धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी राधिका रस्तोगी यांची नियोजन विभागात नियुक्ती करण्यात आली.
  • बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक असलेले १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी लोकेश चंद्र यांची महावितरणच्या मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • आय.ए. कुंदन यांची अल्पसंख्याक विकास विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
  • आशीष शर्मा, IAS (१९९७) AMC, BMC, मुंबई यांना PS(2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • संजीव जयस्वाल, IAS (१९९६) PS, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय यांची म्हाडाचे उपाध्यक्ष आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अंशु सिन्हा, IAS (१९९९) CEO, M.S.खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची सचिव, OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अनुप कृ. यादव, IAS (२००२) सचिव, अल्पसंख्याक विभाग. विभाग यांची सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचलक विजय सिंघल यांची बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तुकाराम मुंढे, IAS (२००५) यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • डॉ. अमित सैनी, IAS (२००७) CEO, MMB, मुंबई यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • डॉ. माणिक गुरसाल, IAS (२००९), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) यांची मेरिटाईम बोर्डचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस (२००८) आयुक्त नाशिक महापालिका यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • कादंबरी बलकवडे, IAS (२०१०) आयुक्त कोल्हापूर महापालिका यांची DG, MEDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • प्रदिपकुमार डांगे, IAS (२०११) Jt.Secy.-c-Mission Director, SBM (ग्रामीण), पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग. मंत्रालय, मुंबई यांना संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्त केले आहे.
  • शंतनू गोयल, IAS (२०१२) आयुक्त, MGNREGS, नागपूर यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • पृथ्वीराज बी.पी., IAS (२०१४) जिल्हाधिकारी, लातूर यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • डॉ. हेमंत वसेकर, IAS (२०१५) CEO, NRLM, मुंबई यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    हे ही वाचा:

    SSC 10th Result 2023, यंदा इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल लागला 93.83 टक्के

    Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

    शिवराज्याभिषेक दिनानिम्मित Raj Thackeray यांनी केली पोस्ट शेअर, माझी एक तीव्र इच्छा…

    Follow Us

    टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss