Friday, December 1, 2023

Latest Posts

कोकणातला प्रवास झाला महाग, दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाश्यांच्या खिशाला कात्री

कोकणातला प्रवास झाला महाग, दिवाळीनिमित्त गावी व पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाश्यांच्या खिशाला कात्री

दिवाळीसाठी अनेक जण आप-आपल्या गावी जात असतात. परंतु आता गावी जाणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीचा मोठा फटका बसणार आहे कारण कोकणात जाणाऱ्या प्रवासी,चाकरमान्यांना जास्तीचे भाडे देऊन एसटीने प्रवास करणार आहे. एसटी महामंडळाने दिवाळीच्या सणामुळे हंगामी भाडेवाढ केली आहे. तसेच रेल्वेचे आरक्षण देखील फुल्ल झाले आहे. यामुळे आता कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी प्रवासी लोकांना एसटीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. खासगी ट्रॅव्हल्सच्या गाडी भाड्यात दुपट्टीने वाढ करण्यात आलेली आहे. या सर्व भाडेवाढीमुळे कोकणातील प्रवाश्यांना आर्थिक फटका बसणार आहे. एसटी परिवहन महामंडळाने रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवार ७ नोव्हेंबर मध्यरात्रीपासून एसटीची हंगामी भाडेवाढ लागू केली आहे. यामुळे आता रत्नागिरी ते मुंबई हा प्रवास एकूण ५० रुपयांनी महागला आहे.

सर्वसामान्य प्रवाश्यांच्या खिशाला कात्री

राज्य परिवहन महामंडळाने हंगामी भाडेवाढ केल्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून येणाऱ्या सर्वसामान्य प्रवाश्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. रत्नागिरी, मुंबई प्रवास हा एकूण ५० रुपयांनी महागला आहे. रत्नागिरीवरुन मुंबईला येण्यासाठी आधी एकूण ५२५ रुपये मोजावे लागत होते. आता एसटीचे तिकीट ५७५ रुपये करण्यात आले आहे. तसेच रत्नागिरी- बोरिवली प्रवासासाठी ५५० ऐवजी आता एकूण ६०६ रुपये मोजावे लागणार आहेत. रत्नागिरी ते ठाणे प्रवास करताना आता ५०५ रुपयांऐवजी ५६० रुपये मोजावे लागणार आहेत. राजापूर- मुंबईसाठी आधी ५९५ रुपये लागत होते त्यासाठी आता ६५५ रुपये द्यावे लागतील. तसेच लांजा बोरिवलीसाठी आधी ५५७ रुपये इतकं तिकीट होतं आता ते ६३५ रुपये झाले आहे.

दिवाळीमुळे रेल्वे पूर्णपणे फुल्ल असताना एसटीने ही हंगामी भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीचा फटका कोकणात येणाऱ्या प्रवाश्यांसह पर्यटकांनाही बसणार आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे अनेक जण आपल्या मित्र परिवारासोबत कोकणात पर्यटनासाठी देखील येतात. एसटीने मंगळवार ७ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या एकवीस दिवसांपर्यंत एकूण १० टक्के दरवाढ प्रवासावर लागू केली आहे. त्याचा फटका आता कोकणात येणाऱ्या पर्यटकांनाही बसणार आहे. यापूर्वी आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही बदलेल्या भाडेवाढीतील फरक द्यावा लागणार आहे.

हे ही वाचा : 

मुंब्य्रातील शाखेवरुन ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट वाद चिघळणार, उद्धव ठाकरे स्वतः मुंब्र्यात जाणार

कमी पाऊसामुळे ऐन दिवाळीत पाणीप्रश्न पेटणार? ‘या’ दोन जिल्ह्यात झाला पाण्यावरून वाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss