spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

आयकर विभागाच्या पथकाकडून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाडाझडती

जळगावलगत असलेल्या चिंचोली शिवारात उभारण्यात येत असलेल्या मेडीकल हबच्या बांधकामासाठी बिलाची रक्कम टीडीएस कपात न करता अदा करण्यात आल्याच्या संशयावरून आयकर विभागाकडून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल १० तास तपासणी करण्यात आली.

जळगावलगत असलेल्या चिंचोली शिवारात उभारण्यात येत असलेल्या मेडीकल हबच्या बांधकामासाठी बिलाची रक्कम टीडीएस कपात न करता अदा करण्यात आल्याच्या संशयावरून आयकर विभागाकडून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल १० तास तपासणी करण्यात आली. यासाठी मंगळवारी २१ जानेवारीला आयकर विभागाचे नाशिक येथील पथक सकाळीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाले होते. पथकाकडून दिवसभर कागदपत्रांची तपासणी करण्यात येऊन संध्याकाळी सातवाजेपर्यंत संपूर्ण झाडाझडती करण्यात आली.

दरम्यान, आयकर विभागाचा ही नियमित तपासणी असल्याचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सायंकाळी एक पत्रकार परिषद घेवून सांगितले. मात्र चिंचोली येथे वैद्यकीय संकुलामध्ये सध्या अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, डेंटल या विभागाचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी जी रक्कम अदा केली जात आहे, त्याचा कोणताही टीडीएस कपात न झाल्याच्या मुद्यावरूनच हे पथक जळगावात आल्याची माहिती पथकाच्यावतीने देण्यात आली.

चिंचोली शिवारामध्ये वैद्यकीय संकुलाला मंजूरी मिळाल्यानंतर त्याच्या उभारणीसाठी केंद्र सरकारच्या एचईसीसी कंपनीला काम देण्यात आले आहे. बांधकामासाठी जवळपास १२०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून रक्कम अदा करताना काही बिलांवर १० टक्के, काही बिलांवर दोन टक्के टीडीएस कपात करणे आवश्यक आहे. मात्र तसे न होता कोणताही टीडीएस कपात झाला नाही व बांधकामासाठी रक्कम अदा केल्याचा संशय आहे. ही रक्कम तब्बल १०० कोटीच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. आयकर विभागाचे आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या दालनात बंदद्वार सायंकाळपर्यंत चौकशी केली. रुग्णालयाच्यावतीने पगार व इतर रकमेसंदर्भातील टीडीएस नियमित कपात होत असल्याचे सांगितले जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी सुरू असली तरी मुख्य तपासणी वैद्यकीय संकुलासाठी अदा करण्यात आलेल्या बिलांच्या टीडीएससंदर्भातच असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचा : 

Davos Investment : Tata Group करणार ३०,००० कोटी गुंतवणूक- CM Devendra Fadnavis

Davos मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट, पहिला करार राज्यातील Gadchiroli साठी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss