शासकीय आदिवासी विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. धुळे शहरातील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयासमोर शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे, मात्र विद्यार्थ्यांना फक्त आश्वासन दिले जात आहे. मात्र त्यांच्या खात्यावर डीबीटीचे पैसे कधी जमा होतील याचे ठोस उत्तर त्यांना मिळत नसल्यामुळे विद्यार्थी चांगले आक्रमक झाले आहे.
आज आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे नंदुरबार जिल्हा दौरावर असताना त्यांना आदिवासी विद्यार्थ्यांचे धुळे शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग कार्यालय बाहेर आंदोलन सुरू असल्याचे समजले व त्यांनी लागलीच आपला ताफा या आंदोलनाकडे वळला. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतले व आज सायंकाळपर्यंत ८०% विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी चे पैसे जमा होतील व यापुढे विद्यार्थ्यांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी संघर्ष करावा लागणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असून येणाऱ्या काळामध्ये डीबीटी चे पैसे वेळेवर विद्यार्थ्यांना मिळावे जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे वेळ देता येईल तसेच यापुढे देखील आदिवासी विभागाने पैसे वेळेवर जमा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.
हे ही वाचा :
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती