spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

एकाचवेळी महाराष्ट्राला सापडले दोन मोठे खजिने; अरबी समुद्रात ८ वर्षांपासून हे संशोधन होते सुरु

महाराष्ट्रात एकाचवेळी दोन मोठे खजिने सापडल्याची बातमी समोर येत आहे. अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्याने भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात १८ हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. अरबी समुद्रात ८ वर्षांपासून हे संशोधन सुरु होते.

भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता
केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे. पालघरमधील डहाणूच्या समुद्रात 5338 आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात 13 हजार 131 चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. आता सापडलेल्या या तेल साठ्यामुळे भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशोधन व उत्खनन कार्याला गती देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या नवीन साठयामुळे अर्थव्यवस्थेला साहाय्य होण्यास मदत होणार आहे. कोकणातील डहाणू आणि मालवण या ठिकाणी तेल विहिरींचे उत्खनन सुरू होईल, जे स्थानिक उद्योगांना चालना देईल आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करतील. यामुळे महाराष्ट्रातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे. अन आशा आहे की, हे नवे तेल साठे भारताला तेल उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.

हे ही वाचा : 

Uddhav Thackeray आणि Eknath Shinde आमने सामने येताच; कहीं पे निगाहें कहीं पे निशाना…

Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss