मुंबईतील संवेदनशील भाग असलेल्या ताज हॉटेल मध्ये एकाच क्रमांकाची नंबर प्लेट असलेल्या दोन गाड्या सापडल्या आहे. हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यास तातडीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरटीओला बोलवून बनावट नंबर प्लेटच्या गाडी चालकाला ताब्यात घेतले आहे. गाडीचा नंबर MH 01 EE 2388 हा क्रमांक दोन गाड्यांवर आढळला. यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी कोणत्या गाडीची नंबर प्लेट असली आणि कोणत्या गाडीची नंबर प्लेट नकली याचा शोध घेण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना बोलवले. त्यानंतर बनावट नंबर प्लेट असलेली गाडी स्पष्ट झाली. बनावट नंबर प्लेट असलेली गाडी पोलिसांनी कुलाबा पोलीस ठाण्यात आणली. कुलाबा पोलीस ठाण्यात त्या कार चालकाची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येणार आहे.
मुंबईत २६/११ हल्ला हा ताज हॉटेलमध्ये झाला होता. त्यावेळी ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवले होते. ताज हॉटेल संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असतो. मुंबई पोलिसांची सुरक्षा आणि ताज हॉटेलची स्वत:ची सुरक्षा या ठिकाणी आहे. त्यानंतर या ठिकाणी एकच क्रमांक असलेल्या दोन गाड्या आल्या. ताज हॉटेल मध्ये एकच क्रमांक असलेल्या गाड्या सापडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्याने ही गाडी ताज हॉटेलमध्ये का आणली? त्याचा त्यामागे काय उद्देश होता? बनावट नंबर प्लेट का लावली? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून शोधली जात आहे.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?