निवडणूका संपताच राज्यात घडलेल्या दोन घटनांनी राज्य हादरून गेल. दोन हत्यांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेल. एक प्रकरण होत मसजोगाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली तर दुसर प्रकरण होत भाजपचेच आमदार असेल्या योगेश टिळेकर यांच्या मामाच पण अपहरण करुन हत्या करण्यात आली. दोन्ही प्रकारणात आधी अपहरण केलं गेल आणि नंतर हत्या करण्यात आली त्यामुळ या दोन घटनांनी राज्य मात्र पूर्ण हादरून गेलं.
संतोष देशमुख यांची हत्या ही आर्थिक वादातून झाल्याची माहिती आहे मात्र हत्या करताना निर्गुण पद्धतीने खून करण्यात आला. ज्या पद्धतीने मारण्यात आलं त्यावर विरोधकांमी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला आणि या प्रकरणातला मास्टर माईंड अजूनही फरार असल्याचा आरोप आहे. आणि त्याचे राजकीय मंत्र्यांशी संबंध असल्याचा उघड आरोप केला जातोय. या प्रकरणात आरोपीला वाचवलं जातंय का ही शंका आल्याने स्वतः शरद पवारांनी मसाजोगाला भेट दिली आणि त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली. हे झालं बीडच, मात्र याच प्रकरणावरून बीडचा बिहार होतोय का ? हा मुद्दा समोर आला.
मात्र पुण्यातला प्रकरण वेगळ्याच वळणावर गेलं त्याच कारण म्हणजे स्वतः पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी दिली आणि ५ लाखात नवऱ्याचा काटा काढला. आपल्याच प्रियकराला ५ लाखाची सुपारी देत अपहरण करत हत्या केली या प्रकरणात पत्नी आरोपीला अटक करण्यात अली आहे. सतीश वाघ कोण होते आपण पाहूयात.
पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते. सतीश वाघ यांची ९ डिसेंबरला अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर त्यांचा मृत्यूदेह शिंदवणे घाटात फेकून दिला. सतीश वाघ 9 डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते.
या दरम्यान ब्ल्यू बेरी हॉटेल बाहेर चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवत त्यांचं अपहरण केलं होतं. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. या दरम्यान त्याच दिवशी रात्री एका ठिकाणी घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. सतीश वाघ यांची अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने भोसकून,अवघ्या १५ मिनिटांमध्ये तब्बल 72 वेळा वार करुन हत्या केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांचा युद्धपातळीवर तपास सुरु होता. चार आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली होती. आता या हत्या प्रकरणात पोलीस तपासात सर्वात मोठा खुलासा समोर आला. नुकताच पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तपासात सतीश वाघ यांच्या पत्नीचा सहभाग असल्याचा समोर आलं आहे. सतीश वाघ यांची पत्नीचा समावेश असल्याचा समोर आल्यावर सर्वांना धक्काच बसला आहे. प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार झाल्याचे समोर आले आहे.
शेजारी राहणाऱ्या सोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याची सुपारी देऊन पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांची पैसे देऊन हत्या पत्नीनेच करायला लावली आहे. मोहिनी वाघ असं सतीश वाघ यांच्या पत्नीचे नाव आहे. जे आर्थिक व्यवहार सतीश वाघ पाहत होते, ते सर्व आर्थिक व्यवहार मोहिनीला तिच्याकडे हवे होते. सतीश वाघ तिला खर्चासाठी पैसे देखील देत नव्हते. यामुळे सुरुवातीला मोहिनीने अक्षयला पती सतीशला गंभीर जखमी करून ते अंथरुणाला खिळून पडतील असे काहीतरी कर, असे सांगितले होतं. त्याचबरोबर मोहिनीने अक्षयला तू जर असं केलं नाही तर आपल्याबद्दल माझ्या नवऱ्याला सांगेन मग तो तुझे काय हाल करेल हे बघ, अशी धमकी दिल्याची माहिती आहे. यामुळे अक्षय दबावाखाली होता. त्यानंतर त्याने कट रचत आरोपींशी संगनमताने सतीश वाघ यांचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर काही वेळातच सतीश यांचा खून करत पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला.
या दोन घटनाने राज्य हादरून गेलंय , आता कायद्याचा वचक निर्माण करणे आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदाच्या धाक निर्माण करणे गरजेचे आहे. कायदा आणि सुव्यस्थ अशीच मोकाट राहिली तर बीडचा बिहार बनायला वेळ लागणार नाही. मग ते बीडच संतोष देशमुख, परभणीचं सोमनाथ सूर्यवंशी की मग पुण्यातल सतीश वाघ कायद्याचा धाक असणे गरजेचं !
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule