Udayanraje Bhosale: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच इतर महापुरुषांवर अनेकदा चुकीची वक्तव्य केली जातात. सातत्याने महापुरुषांवर होणारी चुकीचे वक्तव्य, त्याचप्रमाणे या विरोधात कोणताही कठोर कायदा राज्यात नसल्याने अशी चुकीची वक्तव्य करणाऱ्यांना मोकळीक मिळते. त्यामुळे आता देशात महापुरुषांच्या विरोधात कोणीही चुकीचे वक्तव्य करेल त्याच्या विरोधात कठोर कायदा राज्य सरकारने पारित करावा आणि तो कायदा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करावा अशा मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारकडे केली आहे.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी अलीकडेच मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक केले. औरंगजेब हा उत्तम शासक होता, त्याच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान, बर्मा पर्यंत होती. भारताला सोने की चिडियाँ म्हटले जात होते, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचं विधीमंडळाच्या अधिवेशनातून निलंबन देखील करण्यात आलं. मात्र अजूनही औरंगजेबाबाबतचा वाद शमायला तयार नाही. अलीकडेच भाजपचे नेते नितेश राणे यांनी अबू आझमींना औरंगजेबाच्या कबरी जवळ झोपवायला हवं, असं वक्तव्य केलं. यानंतर राज्यात औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले संतप्त झाले आहे. औरंगजेब देश लुटायला आला होता. त्याचे उदात्तीकरण काय करायचे. औरंगजेबाची कबरच जेसीबी घुसवून उखडून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार उदयनराजेंनी दिली आहे.
यावेळी त्यांना औरंगजेबाचे काही लोकांकडून उदात्तीकरण सुरु असल्याचे विचारले असता ते भडकले. ते म्हणाले की, औंरगजेब देश लुटायला आला होता, त्याचे काय उदात्तीकरण करायचे? औरंगजेब चोर होता. औरंगजेबाची कबर ठेवून काय करणार? जे कोणी लोक औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतात. कदाचित ते त्यांचे भविष्य असेल. त्यांनी ती कबर घेऊन स्वतःच्या घरी घेऊन जावी. औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्यात हिंदू मुस्लिम असा सवालच येत नाही. औरंगजेबाची कबर जेसीबी लावून उखडून फेका. जे लोक कबरीवर जाऊन दर्शन घेतात, औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात ते खपवून घेतलं जाणार नाही, असं उदयनराजे म्हणाले.
हे ही वाचा:
Anil Parab : अनिल परबांच्या छत्रपती संभाजी महाराजांची तुलना केल्यामुळे नव्या वादाला सुरुवात