राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालीये. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच उद्धव ठाकरे धाराशीवला जाताना पुन्हा एकदा त्याच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांची बॅग तपासणी करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांच्या धाराशीव जिल्ह्यात दोन प्रचार सभा होणार आहेत. उद्धव ठाकरे यांची बार्शी शहरात सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. बार्शी उमरगा विधानसभेचे ठाकरेंचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्यासाठी लोहारा येथे एक वाजता तर धाराशीव विधानसभेचे उमेदवार कैलास पाटील यांच्यासाठी धाराशीव शहरात सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.
उद्धव ठाकरेंनी बॅग तपासण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक नेत्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर शरद पवारांनी देखील बॅग तपासणीवरून नाराजी व्यक्त केली. सत्तेचा वापर कसा करायचा आणि विरोधकांना त्रास देणे त्यांनी ठरवलं आहे. सत्ताधाऱ्यांचा एकंदरीत हाच दृष्टिकोन आहे त्यामुळे हे सहन करावे लागेल. त्याबद्दलची नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे. विरोधकांना अशा पद्धतीने वर्तवणूक दिली जाते. याचा काय निवडणुकीवर फार मोठा परिणाम होईल असा काही नाहीये असं शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा:
Khadakwasla Vidhansabha : खडकवासला मतदारसंघाचा आतापर्यंतचा इतिहास काय? Bhimrao Tapkir
एका मंत्र्यासह ८ आमदार परत येणार; Aditya Thackeray यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.