spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री Raksha Khadse यांनी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची भेट घेऊन दिला दिलासा

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी २२ जानेवारीला झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींची गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेऊन आस्थेने चौकशी केली.

जळगाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी पाचोरा स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि या अफवेमुळे दुर्दैवी घटना घडली. आग लागल्याच्या अफवेमुळे काही प्रवाशी घाबरले आणि प्रवाशांनी चेन पुलिंग करून ट्रेन थांबवली आणि खाली उतरले आणि समोरील ट्रॅकवरून येणाऱ्या एक्सप्रेसच्या धडकेत ते सापडले. या दुर्दैवी घटनेत आता पर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींचा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी परवा झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींची गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना भेटून दिलासा देत, “काळजी करू नका, शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. जखमी लवकरच बरे होतील,” असे सांगून त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, तहसीलदार नीता लबडे, सह-जिल्हा शल्यचिकित्सक आकाश चौधरी, तसेच गोदावरी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

परवा झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल व विघ्नहर्ता रुग्णालय येथे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर सर्व नऊ जखमींना गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जखमींच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेत असल्याचे डॉ. केतकी पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना सांगितले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही मंत्री महोदयांना रेल्वे दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी रक्षा खडसे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.

हे ही वाचा : 

Latest Posts

Don't Miss