पुण्याच्या आळंदी येथील शैक्षणिक संस्थेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २८ वर्षीय तरुणाने आळंदीतील शैक्षणिक संस्थेत १२ वर्षांच्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घाणेने आळंदीसह संपूर्ण परिसर हादरला आहे. हि घटना शनिवारी मध्यरात्री घडली. पुण्यातील आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला असलेल्या एका शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडला असून या प्रकरणी तरुणास अटक करण्यात आली आहे. तरुण पाहुणा म्हणून संस्थेत आला होता.
अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार
शनिवारी मध्यरात्री आरोपी पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला. आपल्या संस्थेतला पाहुणा आहे म्हणून मुलं देखील निवांत झोपले होते. तेव्हा मध्यरात्री वासानेची शिकार बनवत १२ वर्षांच्या दोन मुलांवर त्याने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. आळंदीतील या नराधमाच्या कृत्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटने नंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महेश मिसाळ मामा व त्याची बहीण अशा दोघांवर गुन्हा दाखल कारणात आला आहे.
राज्यात महिला, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचं प्रमाण सध्या एवढं वाढलंय की कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न विचारला जातोय. आणि आता २८ वर्षीय तरुणानं वासनेची शिकार बनवत दोन वर्षाच्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलाय की नराधमांना माणुसकी आहे कि नाही असा प्रश्न उपस्तिथ होत आहे.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?