मुंबईत तब्बल दोन वर्षे संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या आणि लाखो लोकांचे जीव घेणाऱ्या कोरोना व्हायरसनंतर आता जगावर पुन्हा एकदा नव्या महामारीचा धोका निर्माण झाला आहे. गेलया काही दिवसांपासून चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे कोरोनाप्रमाणे हा व्हायरस पुन्हा जगभरात पसरणार का, अशी भीती निर्माण झाली आहे. अशातच भारतातील बंगळुरु शहरात HMPV व्हायरसचे दोन रुग्ण सापडल्याचे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, अशा शंका-कुशंका ऐकायला मिळत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजरांचे तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी माध्यमांशी संवाद साधत HMPV व्हायरसबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली.
एचएमपीव्ही व्हायरसमुळे भारताला फारसा धोका नसल्याचे त्यांनी सर्वप्रथम स्पष्ट केले. त्यामुळे भारतीयांना काळजी करण्याची गरज नाही. सध्या चीनमधील लोक मास्क घालून फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, चीनमध्ये प्रदूषणाची समस्या असल्याने तेथील लोक नेहमीच मास्क घालून फिरतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. एचएमपीव्ही व्हायरस हा अत्यंत साधा आहे. तो अगदी कमी किंवा खूप जास्त वय असलेल्या व्यक्तींना होतो. विशेषत: लहान बालकांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण होण्याची धोका असतो. मात्र, यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ आहे, असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले.
एचएमपीव्ही व्हायरस खूप धोकादायक असला तर मग चीनसारख्या प्रगत देशात लहान मुले मोठ्याप्रमाणावर रुग्णालयात का दाखल होत आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत बोलताना डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले की, चीनमध्ये कोरोनाच्या काळात झिरो कोव्हिड पॉलिसी होती. या काळात जी लहान मुले जन्माला आली, ती फारशी घराबाहेर पडली नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही मुले घरातच बसून होती. मुलं जन्माला आल्यानंतर सहा महिने आईचे दूध पितात. हे दूध बंद झाल्यानंतर पुढील सहा महिने मुलांसाठी महत्त्वाचे असतात. या काळात लहान मुलं आजारांचा सामना कसा करावा, हे शिकतात. त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. तसेच चीनमधील मुलं गेल्या दोन-तीन वर्षांपासून घराबाहेर न पडल्यामुळेच त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली नाही. त्यामुळे मुलांना HMPV व्हायरस झाल्यानंतर ती लगेच बरी न होता, त्यांना गंभीर आजार होत आहेत. 2027 पर्यंत HMPV व्हायरस जगातून निघून जाईल. चीनमध्ये लहान बालकांना HMPV व्हायरसची लागण होत आहे. त्यांच्याकडून पालकांना संक्रमण होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ही लहान मुले कुठेही प्रवास करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे HMPV व्हायरस जगभरात पसरण्याची शक्यता नाही, असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?