पुण्यातील प्राईम लोकेशन फर्ग्युसन रोड सगळ्यांना माहिती आहे. फर्ग्युसन रस्त्यावर एका इमारतीचा काम सुरु आहे. या इमारतीत वाल्मिक कराड याने ऑफिस घेतल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली होता. वाल्मिक कराड हा सध्या संतोष देशमुख प्रकरणातील संशयित आरोपी आहे. आमदार धस यांनी पैठणच्या सभेत केलेल्या या दाव्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड यांनी ही गुंतवणूक एका महिलेच्या नावावर केल्याचे उघड झाले आहे. आता ही महिला कोण? ती महिला आणि वाल्मिक कराड यांचे संबंध काय? यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे.
कोण आहे ती महिला?
वाल्मिक कराड याचे पुण्यात फ्लॅट आहेत. पोलिसांना पुण्यात तो शरण आला. यामुळे वाल्मिक कराड आणि त्याच्या पुणे कनेक्शनची चौकशी करा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. मात्र आता पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या इमारतीची कागदपत्रे समोर आली आहेत. यानुसार वाल्मिक कराड याने ज्योती जाधव या महिलेच्या नावाने दोन ऑफिसेस खरेदी केली आहेत.
पुण्यातील इमारतीत काय काय आहे ?
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या कुशल वॉल स्ट्रीट या इमारतीचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी काम सुरू होतानाच वाल्मिक कराड याने गुंतवणूक केली. ही गुंतवणूक ज्योती जाधव या महिलेच्या नावाने केली आहे. या प्रकल्पात ऑफिस नंबर ६१० सी हे अपार्टमेंट आहे. त्यात ४५. ७१ चौ. मी कार्पेट एरियाचे ऑफिस आहे. त्यात बाल्कनी आणि खाली पार्किंगला पण जागा देण्यात आली आहे.
दुसरे ऑफिस नंबर ६११ बी या ऑफिसचा कारपेट एरिया हा ५४.५१ चौसर मिटर आहे. त्यालाही बाल्कनी आणि खाली पार्किंगला जागा देण्यात आली आहे. हा व्यवहार २५ कोटींना झाल्याची माहिती आहे. मात्र ज्योती जाधव या महिलेचा वाल्मिक कराड याच्याशी संबंध काय ? हा प्रश्न आहे. आता या प्रकरणात ईडीकडूनही तपास होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
अजितदादा….दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर…काय म्हणाले Rohit Pawar?
Central Railway चा खोळंबा; उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी