बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या हत्येत ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. १ आरोपी अद्यापही फरार आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड याला देखील अटक करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणाला २ महिने उलटले असून सगळ्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. आता या हत्याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये वाल्मिक कराड याच्याकडे असलेला प्रचंड पैसे आणि त्याच्या श्रीमंतीचा तपशील समोर आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
आरोपपत्रातील या नव्या माहितीनुसार, पोलिसांनी वाल्मिक कराड याच्या सगळ्या मालमत्तेचा तपशील खणून काढला आहे. वाल्मिक कराड याच्याकडे तीन आयफोन होते. संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराड याने या तिन्ही आयफोनमधील डेटा डिलिट केला होता. मात्र, एसआयटी पथकाने तंत्रज्ञांची मदत घेऊन हा डेटा रिकव्हर केला. त्यानंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली.
वाल्मिक कराड याच्या राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. पुण्यात सर्वात हायप्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि एफसी रोड भागात जवळपास 115 कोटीची संपत्ती असल्याची माहिती आहे. याशिवाय, वाल्मिक कराड याच्याकडे अनेक महागड्या गाड्याही असल्याची माहिती समोर आली आहे. या गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहेत.
वाल्मिक कराड हा पायात कधीच चप्पल न घालणारा मात्र त्याला मोबाईलचा भलताच शोक होता. वाल्मिक कराड याच्याकडे एकूण तीन महागडे आयफोन होता. वाल्मिक हा आयफोनच्या लक्झरी सीरीजमधील गोल्ड फोन वापरत होता. वाल्मिकचे सध्या तपासासाठी पोलिसांनी तीन आयफोन जप्त केले आहे. सध्या वाल्मिक कराड गोल्डन रंगाचा आयफोन 16 प्रो वापरत होता. तसेच त्याच्याकडे एक गोल्डन रंगाचा आयफोन प्रो 13 देखील होता. तिसरा आयफोन 13 प्रो फिक्कट निळ्या रंगाचा होता. वाल्मिकचा गोल्डन रंगाचा आयफोन 16 प्रो या फोनची किंमत साधारण तीन लाखापर्यंत आहे. इतर फोन दीड ते दोन लाखांच्या घरात आहे. वाल्मिक कराडकडे महागड्या गाड्या देखील आहे.
कोणत्या महागड्या गाड्या?
फोर्ड इंडेव्हर MH-44/T-0700
अशोक लेलँड लि.(हायवा) MH-44/U-0700
जॅग्वार लैंड रोवर इंडिया MH-44/AC-0700
जेसीबी इंडिया लिमिटेड MH-44/S-7450
मर्सीडीझ बेन्झ इंडिया प्रा.ले. MH-44/Z-0007
बीएमडब्लु इंडिया प्रा. लि. MH-44/AC-1717
अशोक लंयलँड लि.(हायवा) MH-44/U-1600
सुदर्शन घुलेकडे कोणत्या गाड्या होत्या?
कंपनी – टोयोटो इनोवा गाडी क्र. ME-44/AB-1717
ट्रॅक्टर (महिंद्रा & महिंद्रा नि.) MH-44/D-4512
ट्रॅक्टर (महिंद्रा & महिंद्रा नि) MH-44/S-6973
हे ही वाचा:
‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश