Thursday, April 25, 2024

Latest Posts

तब्बल २८ राज्यांमध्ये धावणार Vande Bharat Express

सध्या भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) ही संपूर्ण देशभरात लोकप्रिय गाडी झाली आहे.

सध्या भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) ही संपूर्ण देशभरात लोकप्रिय गाडी झाली आहे. तसेच अनेक मार्गावरून ही गाडी आता धावू लागली आहे. यामुळे उर्वरित अनेक ठिकाणी ही गाडी सुरु करण्याची मागणी ही केली जात आहे. आता महाराष्ट्रात लवकरच चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.

संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसची चर्चा ही आहे. तसेच महाराष्ट्रात देखील या ट्रेनला चांगलाच प्रतिसाद हा मिळत आहे. आता महाराष्ट्रातून लवकरच चौथी वंदे भारत एक्सप्रेस ही धावणार आहे. सर्वात पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबई गांधीनगर या दरम्यान धावली आहे. मुंबई गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर या मार्गावर दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली. तसेच मुंबईवरुन शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. आता चौथी गाडी मुंबई-गोवा सुरु होणार आहे.

तसेच पहिली वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली होती. त्यानंतर दिल्ली ते जम्मू सुरु झाली होती. सध्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर, गुजरात, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशसह दक्षिण भारतातून ही रेल्वे धावत आहे. देशातील २१ राज्यांमधून तिचा प्रवास सुरु आहे. तसेच स्वदेशी तंत्रज्ञानाने बनलेली सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस सध्या २१ राज्यांमधून धावत आहे. फक्त बिहार, झारखंड आणि गोव्यामधून ही ट्रेन धावत नाही. परंतु आता गोव्या मधून देखील ही ट्रेन धावली जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून १६ मे रोजी वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन यशस्वी झाली. मुंबईवरुन गोव्यासाठी १६ डब्यांची एक्स्प्रेस सुसाट धावली. आता ही गाडी जून महिन्यात सुरु होणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. तेजस एक्स्प्रेसपेक्षाही कमी वेळ या गाडीने घेतला होता.

हे ही वाचा:

Degree courses च्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

नितेश राणेंची खोचक टीका, Sanjay Raut म्हणजे मविआची ‘Gautami Patil’

Shubman Gill ने झळकावली एकाच सीझनमध्ये तीन शतके, अंतिम सामन्यात चौथे शतक?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss