Wednesday, November 29, 2023

Latest Posts

Vande Sadharan Express प्रवाशांसाठी होणार दाखल

या परिसरांमध्ये ही गाडी पास झाली की ताबडतोब महत्त्वाच्या शहरांमध्ये गाडी चालवण्यात येण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात येणार आहे. मुंबईमधून ही गाडी मुंबई ते दिल्ली आणि मुंबई ते पटना त्या दोन मार्गांवर चालवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वंदे साधारण एक्सप्रेस (Vande Sadharan Express) आता प्रवासांसाठी दाखल होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या (Vande Bharat Express) नंतर प्रवाशांसाठी वंदे साधारण एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. वंदे भारतनंतर बनवण्यात आलेली वंदे साधारण एक्सप्रेस सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेली सुपरफास्ट नॉन एसी एक्सप्रेस (Non AC Express) आहे. पुश-पूल (LHB push pull) ट्रेन म्हणजेच वंदे साधारण एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. वंदे साधारण ही एक्सप्रेस नुकतीच चेन्नईच्या (Chennai) इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून तयार होऊन मुंबईत दाखल झाली आहे. फेब्रुवारी २०१९ (February 2019) मध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून उच्च आणि मध्यमवर्गीय प्रवाशांच्या पसंतीस उतरली. उच्चभ्रू नागरिकांनी वंदे भारतचा प्रवास करून त्यातील सुख-सुविधांचा लाभ घेतला. मात्र, गरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी देखील त्याच दर्जाच्या सोयी आणि सुविधांसह कमी किंमतीत प्रवास करण्यासाठी वंदे साधारण एक्सप्रेस बनवण्यात आली आहे. या एक्सप्रेसमुळे सामान्य व्यक्तींना फायदा होणार आहे. या एक्सप्रेसमध्ये पुश पुल टेक्नॉलॉजी असलेले दोन इंजिन पुढे आणि मागे लावण्यात आलेले आहेत. एक्सप्रेसमध्ये १२ स्लीपर नॉन एसी कोच (Sleeper Non Ac Coach), आठ जनरल कोच, आणि दोन कोच असणार आहेत.

या गाडीमध्ये वंदे भारत प्रमाणेच अनेक नवीन आणि अद्ययावत सोयी-सुविधा देण्यात आलेल्या आहेत. या एक्सप्रेसला भगवा आणि करडा रंग देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मजूर आणि कामगार वर्गासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ताशी १३० च्या वेगाने ही एक्सप्रेस धावणार आहे. सध्यातरी ही एक्सप्रेस मुंबईमध्ये कसारा घाटात वेगवेगळे परीक्षण करण्यासाठी आणण्यात आलेली आहे. या परिसरांमध्ये ही एक्सप्रेस पास झाली की ताबडतोब महत्त्वाच्या शहरांमध्ये गाडी चालवण्यात येण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात येणार आहे. मुंबईमधून ही गाडी मुंबई ते दिल्ली आणि मुंबई ते पटना त्या दोन मार्गांवर चालवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

KALYAN: पाणीपुरवठा राहणार बंद

वाढत्या वयाबरोबर ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, रहाल निरोगी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss